ETV Bharat / state

Islampur Crime : उंदीर मारण्याचे औषध घालून पतीस दिला गुलाबजामून; पत्नीला ठोकल्या बेड्या - इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा

गुलाबजामूनमधून उंदीर मारण्याचे औषध घालून पतीला ठार मरण्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपुरच्या पेठ येथे समोर आला आहे. या प्रकरणी पती प्रसन्न खंकाळे यांच्या तक्रारीवरून इस्लामपूर पोलिसांनी (Islampur Police) पत्नी गौरी खंकाळे हिला अटक केली आहे.

CRIME
इस्लामपूर पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 6, 2022, 3:07 PM IST

Updated : Apr 6, 2022, 4:04 PM IST

सांगली - गुलाबजामूनमधून उंदीर मारण्याचे औषध घालून पतीला ठार मरण्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपुरच्या पेठ येथे समोर आला आहे. या प्रकरणी पती प्रसन्न खंकाळे यांच्या तक्रारीवरून इस्लामपूर पोलिसांनी (Islampur Police) पत्नी गौरी खंकाळे हिला अटक केली आहे. वाळवा तालुक्यातल्या इस्लामपूर नजीक असणाऱ्या पेठ येथे पत्नीकडून पतीचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विषप्रयोग करून पतीच्या हत्याचा प्रकार समोर आला आहे. गुलाबजामूनमधून उंदीर मारण्याचे औषध घालून खुनाचा प्रयत्न पतीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.

विषप्रयोग करणा्ऱया पत्नीला अटक - याबाबत इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहितीप्रमाणे, पेठ येथील प्रसन्न खंकाळे याचा गौरी हिच्याशी काही महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. मात्र, काही दिवसांपासून सासरच्या मंडळींशी गौरी हीच वाद सुरू होता. यातून गौरी हिने पती प्रसन्न याच्यावर विषप्रयोग सुरू केले होते. दोन दिवसांपूर्वी गौरी हिने गुलाबजामून करून प्रसन्न यांना खाण्यासाठी दिले. मात्र, प्रसन्न याने गुलाबजामून खाण्यास टाळाटाळ केली, पण गौरी हिने गुलबाजामून खाण्याबाबत आग्रह धरला, ज्यातून बुरशी आल्याप्रमाणे गुलाबजामून दिसल्याने प्रसन्न याला संशय आला. त्याने गुलाबजामून फोडून पाहिले असता, त्यामध्ये उंदीर मारण्यासाठी वापरले जाणाऱया औषधाचे तुकडे आढळून आले. प्रसन्न याने खडसावून पत्नी गौरीला विचारले असता, आपली चूक झाल्याचे सांगत माफ करण्याची गयावया सुरू केली. मात्र, पती प्रसन्न याने थेट इस्लामपूर पोलीस ठाणे गाठत पत्नी गौरी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत गौरी खंकाळे हिला पतीला जीव मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केली आहे. तसेच न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याआधी झाले होते विषप्रयोग - गौरी हिने याआधी जेवणाचा डबा आणि चहातून फिनेले घालून जीवे मारण्याचा प्रकार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. फिनेले आणि इतर विषारी औषधांचा प्रयोग करून गौरी हिच्याकडून पती प्रसन्न याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. प्रसन्न हे त्या-त्या वेळी दैव बलवत्तर म्हणून बचावले.

Last Updated : Apr 6, 2022, 4:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.