कोल्हापूर - कडकनाथ कोंबड्यांचा घोटाळा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झाला. फडणवीस यांच्या आशीर्वादानेच या घोटाळ्याची चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही. कडकनाथ घोटाळा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसे नसावे, याचे उत्तम उदाहरण आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर इथल्या शेतकऱ्यांना कृषी कायदे कसे चांगले आहेत हे सांगण्यासाठी आले आहेत. याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून कडकनाथ घोटाळ्यात बुडालेले पैसे वसूल करून द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र उलट शेतकऱ्यांचीच धरपकड केल्याने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
घोटाळे बहाद्दरांसाठी पोलीस बंदोबस्त कशाला - राजू शेट्टी - राजू शेट्टींची फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडणवीस आज इस्लामपूर इथल्या शेतकऱ्यांना कृषी कायदे कसे चांगले आहेत हे सांगण्यासाठी आले आहेत. याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून कडकनाथ घोटाळ्यात बुडालेले पैसे वसूल करून द्या, अशी मागणी शेतकरी करत आहेत. यावर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी फडणीस व सदाभाऊ खोत यांना टोला लगावला आहे.
![घोटाळे बहाद्दरांसाठी पोलीस बंदोबस्त कशाला - राजू शेट्टी Raju Shetty on fadanvis and sadabau khot](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10027286-968-10027286-1609076886191.jpg?imwidth=3840)