सांगली - परंपरा मोडण्याचा भाजपचा हातखंडा आहे, पण राज्यपाल स्वतंत्र विचाराचे असल्याने ते मंत्री मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आमदार नियुक्त करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त करत भाजपवर टीका केली. राज्यपाल नियुक्त आमदार यादीवरून जयंत पाटील सांगलीमध्ये बोलत होते.
परंपरा मोडण्याचा भाजपचा हातखंडा - जलसंपदा मंत्री जयंत पाटील - परंपरा मोडण्याचा भाजपचा हातखंडा
राज्यपाल स्वतंत्र विचाराचे असल्याने ते मंत्री मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आमदार नियुक्त करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त करत भाजपवर टीका केली. राज्यपाल नियुक्त आमदार यादीवरून जयंत पाटील सांगलीमध्ये बोलत होते.
सांगली
सांगली - परंपरा मोडण्याचा भाजपचा हातखंडा आहे, पण राज्यपाल स्वतंत्र विचाराचे असल्याने ते मंत्री मंडळाने दिलेल्या सूचनेप्रमाणे आमदार नियुक्त करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त करत भाजपवर टीका केली. राज्यपाल नियुक्त आमदार यादीवरून जयंत पाटील सांगलीमध्ये बोलत होते.
राज्यपाल नियुक्त आमदार यादीवरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारकडून 12 आमदार नियुक्तीची यादी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाकडून पंधरा दिवसात नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना राज्यपालांना देण्यात आल्या आहेत. आजपर्यंत मंत्रिमंडळाकडून करण्यात आलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाहीत, ही प्रथा आहे.
परंपरा मोडणे भाजपचा हातखंडा..
मात्र, भाजपचा सध्याच्या यंत्रणांकडून आजपर्यंतच्या चालत आलेल्या परंपरा परंपरा मोडणे, यामध्ये हातखंडा आहे. पण मला खात्री आहे, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे असल्याने आमदारांच्या नियुक्तीला मान्यता देतील, अशी आमची अपेक्षा आहे, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सरनाईकांवरवर अन्याय जनतेची भावना..
शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आमदार सरनाईक यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही विरोधकांना अडचणीत आणण्याचे जाणीवपूर्वक काम असल्याची भावना जनतेच्या मनात आज निर्माण झाली आहे. तसेच व्यावसायिक म्हणून सरनाईक हे मोठे झाले आहेत. आमदाराकीचा वापर त्यांनी केला नाही, त्यामुळे लवकर सत्य बाहेर येईल आणि केलेली कारवाई चुकीचे आहे, हे जनतेच्या लक्षात येईल, अशी आमची भावना असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.