ETV Bharat / state

'ते' हिंदूंचा अपमान करत असताना हिंदूहृदयसम्राटांचे वारसदार मूग गिळून गप्प का? - vinayak mete criticize sharad pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर भाष्य करत संपुर्ण हिंदू समाजाचा आणि त्यांच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. मात्र, ज्या बाळासाहेबांनी त्यांचे आयुष्य हिंदू धर्मासाठी वेचले, त्या हिंदूहृदयसम्राटांचे वारसदार मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.

Uddhav Thackeray and Sharad Pawar
शरद पवार उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 20, 2020, 3:46 PM IST

नाशिक - अयोध्येत राम मंदिर बांधल्यावर कोरोना जाणार का? असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवत राम मंदिर उभारले नाही, तर करोना देशातून जाईल का? या प्रश्नाचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, असा प्रतिप्रश्न शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी विचारला. तसेच शरद पवार यांनी देशातील लाखो हिंदू समाजाच्या श्रध्देचा अपमान केला असून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मूग गिळून बसल्याचा घणाघात मेटे यांनी केला.

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - राम मंदिर बांधून कोरोना महामारी जाणार नाही; त्यासाठी उपाययोजना महत्वाच्या : शरद पवार

दूध दर आंदोलनावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले. बाळासाहेब यांनी त्यांचे सर्व आयुष्य हिंदुंच्या रक्षणासाठी वेचले. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सत्तेत आहे. बाळासाहेबांचे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री असून राष्ट्रवादीकडून हिंदू धर्मावर टिका टिपण्णी केली जात आहे. असे असताना उध्दव ठाकरे हे मूग गिळून बसले आहे. त्यांनी हिंदूहृदय सम्राट यांचे वारसदार म्हणून या मुद्यावर भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन मेटे यांनी दिले.

राज्यात कोणी सुखी नाही...

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सत्तेत शेतकरी, धनगर, दूध उत्पादक सर्व दुखी असून राज्यात कोणीही सुखी नाही, अशी टिका मेटे यांनी केली. ग्राम पंचायतींवर भ्रष्टाचार करण्यासाठी राजकिय कार्यकर्त्यांची नेमणूक केली जात असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी लोकशाहीचा खुन केल्याची जहरी टिका त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.