ETV Bharat / state

'कोरोना रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक पावले उचलावी' - जितेंद्र डूडी

सांगली जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना दक्षता समित्यांना कडक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

'कोरोना रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक पावले उचलावी'

author img

By

Published : May 5, 2021, 9:34 AM IST

सांगली : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला वाढता कोरोना रोखण्यासाठी आता कोरोना दक्षता समितीने कडक पावलं उचलली पाहिजे असे आवाहन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे. तसेच कडक कारवाईबाबत दक्षता समितीला अधिकारही देण्यात आल्याचे डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

'कोरोना रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक पावले उचलावी'
ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या अधिकसांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या ग्रामीण भागात आढळून येत आहे. 14 एप्रिलपासून राज्यात कडक लॉकडाऊन असतानाही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषद घेऊन कोरोना दक्षता समित्यांना कडक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.दक्षता समित्यांनी कडक पावले उचलावीमुख्य कार्यकारी अधिकारी डूडी म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र या समितीच्या माध्यमातून ज्या पध्दतीने कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करायच्या आहेत, त्या होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातल्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता आपल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. काही गावांत दक्षता समित्यांनी चांगले काम केलं आहे. त्यामुळे त्या गावात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही. तर पुढील दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या 10 दिवसांत जर रुग्णसंख्या कमी झाली नाही, तर रुग्णसंख्येचा उद्रेक होईलय त्यामुळे दक्षता समित्यांनी एक्शन मोड मध्ये आले पाहिजे आणि आपल्या गावात कोरोनाला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलली पाहिजे. जे लोक कोरोना नियमांचे पालन करत नाही, त्यांच्यावर कडक कारवाई या समितीकडून होणे आता अपेक्षित आहे. समितीला तसे अधिकारीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत असं मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.