सांगली - सिगारेट दिली नाही, या क्षुल्लक कारणातून मारहाण करत दुकान, चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवून देण्याचा प्रकार घडला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील पाटगावमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल करुन दोघांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
पाटगावमधील एका दुकानदाराकडे गावातील एका व्यक्तीने सिगारेट मागितली होती. मात्र, दुकानदाराने ते देण्यास नकार दिला. या कारणामुळे सिगारेट मागणाऱ्या व्यक्तीने दुकानदाराला मारहाण केली. दुकानदाराचे दुकान, त्याठिकाणी उभी असणारी चारचाकी गाडी आणि ३ दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, हे सर्वजण मिरज-पंढरपूर रस्त्याच्या कामावरचे मजूर आहेत. यामधील दोघांना अटक करण्यात आली आहे.