सांगली - शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. शहरात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वीज पडून महिलेचा मृत्यू
सायंकाळनंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. जत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. तुळसाबाई यशवंत डोंबाळे (50) असं या महिलेचे नाव आहे. दरम्यान या अवकाळी पावसामुळे उकड्याने हैरान झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद! १९ वर्षीय गोल्फपटूने आपली कमाई दिली कोविड लसीकरण मोहिमेला