ETV Bharat / state

अंकलीजवळ तिहेरी अपघात, दोन कामगारांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 9, 2019, 3:53 PM IST

अंकली येथे दुचाकी, चारचाकी आणि एसटीचा तिहेरी अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री मिरज-कोल्हापूर रोडवरील अंकली येथे घडली.

sangli
अंकली नजीक तिहेरी अपघातात दोन कामगार ठार

सांगली- अंकली येथे दुचाकी, चारचाकी आणि एसटीचा भीषण अपघात झाला. या तिहेरी अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री मिरज-कोल्हापूर रोडवरील अंकली येथे घडली.

प्रवीण हुचगोळ (वय २६) आणि मनोज कांबळे (वय २५), असे मृत व्यक्तींची नावे आहेत. हे दोघेही विटभट्टी कामगार असून अंकलीजवळच्या इनाम धामणी येथील रहिवासी आहेत. दोघेही काम आटोपल्यानंतर काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून अंकलीकडे निघाले होते. यावेळी एसटी बसला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे तिन्ही वाहनांची एकमेकांनाही जोरदार धडक झाली. यावेळी चारचाकी वाहन उलटून रस्त्याच्या पलीकडे गेले. जखमी दुचाकीस्वारांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Intro:
File name - mh_sng_01_accsident_img_01_7203751 - mh_sng_01_accsident_img_06_7203751

स्लग - तिहेरी अपघातात दोन कामगार ठार,अंकली नजीक घडला अपघात...

अँकर - सांगलीच्या अंकली येथे झालेल्या तिहेरी अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.दुचाकी, चारचाकी आणि एसटी असा तिहेरी अपघात घडला आहे.ज्यामध्ये दुचाकीवरून जाणारे दोघे कामगार ठार झाले आहेत.Body:सांगली नजीकच्या मिरज -कोल्हापूर रोडवरील अंकली येथे रविवारी रात्री तिहेरी अपघात झाला आहे.या अपघातात 2 जण ठार झाले आहेत.प्रवीण हुचगोळ,वय 26 आणि मनोज कांबळे ,वय 24 असे या मृतांचे नावे आहेत.हे दोघेही विटभट्टी कामगार असून अंकली नजीकच्या इनाम धामणी येथील रहिवाशी असून काम आटोपल्यानंतर काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून अंकलीकडे निघाले होते.यावेळी एसटी बसला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक बसली,तर वेळी या तिन्ही वाहनांची एकमेकांनाही जोरदार धडक झाली.तर यावेळी चारचाकी वाहन हे पलटी खाऊन रस्त्याच्या पलीकडे गेली.यानंतर जखमी दुचाकीवस्वरांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल आले.मात्र त्या दोघांचा उपचाराआधी मर्त्य झाला. या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.