ETV Bharat / state

सांगली : आणखी दोन नवे कोरोना रुग्ण सापडले, ३ जण कोरोनामुक्त - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली जिल्ह्यात मंगळवारी आणखी दोन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा १२३ वर पोहोचला आहे. यातील ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अ‌‌‌‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५२ एवढी आहे.

Two more test Covid-19 positive in sangli
सांगली : आणखी दोन नवे कोरोना रुग्ण सापडले, ३ जण कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 3, 2020, 9:40 AM IST

सांगली - जिल्ह्यात मंगळवारी आणखी दोन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा १२३ वर पोहोचला आहे. यातील ६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर अ‌‌‌‌ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५२ एवढी आहे. तासगाव आणि आटपाडी तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णांलयामधून घरी पाठवण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी आणखी दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईहून तासगावमध्ये २२ मे रोजी आलेल्या एका कोरोनाबाधित तरुणाच्या ५८ वर्षीय आईला कोरोनाची लागण झाली आहे. तर आटपाडी तालुक्यातील झरे येथील ५७ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे.

कोरोनावर उपचार घेत असलेले ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नागोळे येथील २२ वर्षीय तरुण, कडेगाव तालुक्यातील भिकवडी येथील ६५ वर्षीय व्यक्ती आणि वाळवा जांभूळवाडी येथील २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दरम्यान, नविन रुग्णांच्या पार्श्वभूमिवर अनुषांगिक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा - राजेश नाईक फाऊंडेशनकडून रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

हेही वाचा - 'कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय विभागास आवश्यक सामुग्री उपलब्ध करून द्या'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.