सांगली - शहरातल्या दोन टोळ्या हद्दपार करण्यात आल्या आहेत. जाधव आणि सातपुते टोळीतील 18 जणांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गंभीर स्वरुपाचे दाखल गुन्हे आणि गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याने सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचे वृत! म्हणाले, सामना वाचायचा नाही अन् राऊतांवर बोलायच नाही
शहरातील 2 टोळ्यांवर तडीपारीची कारवाई : सांगली शहर परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातपुते आणि जाधव यांच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलीस ठाण्याकडून सातपुते आणि जाधव टोळीवर तडीपार करवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार सातपुते आणि जाधव टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सांगली शहरातल्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
जाधव टोळीतील 11 जण हद्दपार : ओंकार जाधव टोळीवर 2013 पासून 2022 पर्यंत सांगली शहर विश्रामबाग आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खून, खुनाचे प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवणे, मारामारी करणे, गुन्हेगारी कारवायांचा समावेश आहे. त्याचबरोबर, या गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याने जाधव टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख 1) ओंकार सुकुमार जाधव, वय २९ वर्षे , रा.गारपीर दर्गाजवळ,गणेशनगर, याच्यासह 2 ) शुभम कुमार शिकलगार , वय २३ वर्षे 3 ) गारपीर दर्गाजवळ, गणेशनगर, सुज्योत ऊर्फ बापू सुनिल कांबळे, वय २३ वर्ष, रा. रमा मातानगर, काळे प्लॉट 4 ) आकाश ऊर्फ अक्षय विष्णू जाधव वय २४ वर्षे, रा. गारपीर दर्ग्याजवळ, गणेशनगर 5 ) अमन अकबर शेख, वय २० वर्षे, रा.अलिशान चौक, गणेशनगर 6 ) कृपेश घनःश्याम चव्हाण, वय २९ वर्षे, रा. माने चौक, १०० फुटी रोड 7 ) ऋषिकेश दुर्गादास कांबळे, वय २१ वर्षे रा. भिमाई निवास, विठ्ठलनगर 8) साहिल हुसेन शेख, वय २२ वर्षे, रा. नुराणी मशीदजवळ १०० फुटी रोड 9) राहुल रमेश नामदेव वय २९ वर्षे, रा. गारपीर चौक 10 ) प्रेमानंद इराप्पा अलगंडी, वय ३१ वर्ष, रा. गारपीर चौक 11 ) गणेश चन्नाप्पा बोबलादी, वय २४ वर्षे, रा. प्रगती कॉलणी, डायमंड हॉटेलच्या पाठीमागे १०० फुटी रोड सर्व राहणार सांगली. या सर्वांना 6 महिन्यांच्या कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सातपुते टोळीतील 5 जणांवर कारवाई : शहरातील अहमदनगर परिसरातील सातपुते टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. सातपुते टोळीवर सांगली आणि मंगळवेढा, जिल्हा - सोलापूर पोलीस ठाण्यात 9 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये खून, खुनाचे प्रयत्न, मारामारी, दहशत निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याने टोळी प्रमुख 1 ) गणेश सातपुते, वय 33, रामामाता नगर, कुदळे प्लॉट, याच्यासह 2 ) रोहित कुदळे, वय 32, रामामाता नगर, कुदळे प्लॉट 3 ) हैदरअली पठाण, वय 30, रामामाता नगर, कुदळे प्लॉट 4 ) जाफर पठाण, वय 29, रामामाता नगर, कुदळे प्लॉट 5 ) गणेश मोरे, वय 26, गारपीर चौक 6 ) निखिल गाडे वय 31, रामामाता नगर, कुदळे प्लॉट 7 ) राहुल माने, वय 29, रामामाता नगर, कुदळे प्लॉट, सर्व राहणार, सांगली. या सर्वांना 6 महिन्यांसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.