ETV Bharat / state

सांगली-कोल्हापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

सांगली कोल्हापूर महामार्गाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकी स्वारांचा मृत्यू; मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला अपघात.

sangali road accident
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार
author img

By

Published : Oct 29, 2020, 8:57 AM IST

सांगली - कोल्हापूर महामार्गावरील वाघवाडी फाटा येथील इंदिरा पॅलेस जवळ एक अज्ञात वाहन दुचाकीला उडवून गेल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. रफिक इब्राहीम मुल्ला आणि सुरज संभाजी जाधव( दोघे रा. विठ्ठलवाडी ता. वाळवा ) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत फिरोज अब्दुल मुल्ला यांनी पोलिसात तक्रार दिली.

घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी नव्हता

याबाबत माहिती अशी, की मुल्ला आणि जाधव दोघे दुचाकीवरून (एमएच १० ए यु ७३१८ ) मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास महामार्गावरून प्रवास करत होते. त्यांची दुचाकी वाघवाडी फाट्यावर आली असता, एका अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. घटनेनंतर वाहनासह वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेवेळी कोणीच प्रत्यक्षदर्शी उपस्थित नसल्यामुळे नक्की कोणत्या वाहनाने यांना उडवले याची माहिती मिळाली नाही.

या अज्ञात वाहनाच्या धडकेत अतिरक्तस्राव होऊन मुल्ला आणि जाधव हे दोघेही ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री उशिरा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता पाठवले. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.