सांगली - जिल्ह्यातील पोलीस दलात 24 जण अनुकंपा तत्वावर भारती झाले आहेत. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला याबाबतचे नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या हस्ते हा प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
अनुकंपावर 24 जण पोलीस दलात दाखल -
2018 पासून सांगली पोलीस दलात सेवेत असणाऱ्या 27 पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांचा विविध कारणांनी सेवा बजावताना मृत्यू झाला. दरम्यान कोरोना काळातही 6 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी संबंधित नातेवाईकांनी त्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी मिळावी यासाठी अर्ज केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पोलीस दलातील, मृत्यू झालेल्या पाल्यांना सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगली पोलीस दलातील 27 पैकी 24 जणांची भरती झाली आहे. पोलीस मुख्यालय येथे दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या हस्ते मृत्यू पोलीस कुटुंबातील 24 मुला-मुलींना शिपाई पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. अत्यंत भावनिक असा हा छोटेखानी सोहळा पार पडला, या कार्यक्रमाला पोलिस दलातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसह सह पोलीस कुटुंबीय मोठ्या संख्येने हजर होते.
1 वर्षाचे असणारे प्रशिक्षण -
अनुकंपा तत्वा खाली शासकीय सेवेत नोकरी मिळने, खूप कठीण असते. मात्र, राज्य सरकारने घेतलेला निर्णय आणि सांगली पोलीस दलाने या भरतीबाबत दाखवलेली तत्परता, यामुळे पोलीस कुटुंबातील 24 जण आज पोलिस दलात रुजू झाले आहेत. हे सर्वजण एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सेवा बजवण्यासाठी तैनात असणार आहेत.