ETV Bharat / state

सांगलीमधील संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध, दोन दिवसांत दुकाने उघडण्याचा इशारा

author img

By

Published : Apr 7, 2021, 4:05 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाची सांगली जिल्ह्यात अंमलबजावणी कडक पद्धतीने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सांगली जिल्ह्यातील सर्व व्यापार आणि दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. मात्र प्रशासनाच्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध कोला आहे.

सांगलीमधील संचारबंदीला व्यापाऱ्यांचा विरोध

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाची सांगली जिल्ह्यात अंमलबजावणी कडक पद्धतीने सुरू आहे.अत्यावश्यक सेवा वगळता सांगली जिल्ह्यातील सर्व व्यापार आणि दुकाने बंद करण्यात आलेली आहेत. मात्र प्रशासनाच्या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध कोला आहे.

व्यापारी आणि प्रशासनात संघर्ष ?

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, राज्य सरकारकडून कडक निर्बंध राज्यात लागू करण्यात आलेले आहेत, या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या आदेशामुळे सांगली जिल्ह्यात व्यापारी आणि प्रशासन असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

दुकाने उघडल्यास कारवाई

मंगळवारी सायंकाळी पालिका आणि पोलीस प्रशासनाने रस्त्यावर उतरत आवश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद करण्याची कारवाई सुरू केली, यानंतर व्यापारी आणि प्रशासनामध्ये अनेक ठिकाणी वाद झाला. व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध करत दुकान बंद न करण्याची भूमिका घेतली. मात्र महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने बंद करण्याचे आदेश असल्याचे स्पष्ट करत, जे व्यापार आणि दुकान सुरू ठेवतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी..!

बुधवारी सकाळपासून महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगली महापालिका क्षेत्रातल्या सर्व बाजार पेठेतील दुकाने बंद आहेत, केवळ अत्यावश्यक सेवा या ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यात लॉकडाउनचे चित्र पाहायला मिळत आहे.

दुकाने बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

दरम्यान व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीने लॉकडाऊनला विरोध करण्यात आलेला आहे, राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे, मात्र इतर दिवशी देखील दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले जात आहे, त्याला आमचा विरोध आहे. प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना नियम, अटी घालून दुकान चालू करण्याची परवानगी द्यावी. 2 दिवसांपासून व्यापारी अन्याय सहन करत आहेत, मात्र आता सहनशीलता संपत चालली असून, नऊ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा. अन्यथा 9 एप्रिल नंतर व्यापारी सर्व दुकाने उघडतील असा इशारा व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी दिला आहे.

हेही वाचा - पंढरपुरातील व्यापाऱ्यांचा टाळेबंदीला विरोध.. उद्यापासून दुकाने खुली करण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.