ETV Bharat / state

निसर्गाची मुक्त उधळण; गोकाक धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पावसाचे दमदार आगमन झाल्याने पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. कर्नाटकच्या बेळगावातील गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागल आहे. हे नियनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

गोकाक धबधबा
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:24 AM IST

Updated : Jul 4, 2019, 2:17 PM IST

सांगली - निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या कर्नाटकातील गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. शेकडो फुटांवरून कोसळणाऱ्या आणि मनात धडकी भरवण्याबरोबर मन प्रसन्न करणाऱ्या विलोभनीय, अशा या गोकाक फॉल्सचे रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील काही हौशी पर्यटकांनी गोकाक फॉल्सचे व्हिडीओ ईटीव्ही भारतसोबत शेअर केले आहेत.

निसर्गाची मुक्त उधळण करणारा गोकाक धबधबा

भारतातील नायगरा फॉल्स म्हणून ओळखला जाणारा कर्नाटकमधला गोकाक फॉल्स पावसामुळे प्रवाहित झाला आहे. कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाकजवळील असणाऱ्या कोन्नूर येथे घटप्रभा नदीवर हा धबधबा आहे. आज हा धबधबा देशभरात नव्हे तर जगभरात पर्यटकांना साद घालत असतो. सुमारे १७१ फुटांवरून हा धबधबा कोसळतो. पावसाळा सुरू झाला, की या ठिकाणी लाखो पर्यटक अद्वितीय धबधबा पाहण्यासाठी गर्दी करतात.

यंदा उशिरा सुरू झालेल्या मान्सूनमुळे गोकाकचा धबधबा प्रवाहित होण्यास थोडा उशीर झाला असला तरी आता धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा विशाल धबधबा चारही दिशेने पर्यटकांना पाहता येतो. विशेष म्हणजे जेथून हा धबधबा शेकडो फूट खाली कोसळतो त्या स्पॉटपर्यंत पर्यटकांना सहज पोहचता येते. तर ज्या घटप्रभा नदीवरून हा धबधबा खाली कोसळतो, त्या धबधब्याच्या काही अंतरावर ब्रिटिशांनी एक पूल उभारला असून तो झुलता पूल म्हणून ओळखला जातो. ६५९ फूट लांबीचा हा झुलता पूल आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. पाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला तरी खडकांवर उभारलेला हा पूल अजूनही उत्तम स्थितीत आहे. गोकाकचा धबधबा जणू निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार असाच म्हणावा लागेल. ज्या क्षमतेने हा धबधबा कोसळतो ते पाहून मनात धडक तर भरतेच शिवाय डोळ्यांचे पारणेसुद्धा फिटते.

Intro:सरफराज सनदी - सांगली

Av

Feed send file name - mh_sng_04_gokak_foalls_vis_1_7203751 - to - mh_sng_04_gokak_foalls_vis_5_7203751

स्लग - निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या कर्नाटक मधला गोकाक धबधबा वाहू लागाल ओसंडून.

अँकर - निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या कर्नाटक मधला गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला.शेकडो फुटांवरून कोसळणारा आणि मनात धडकी भरवण्याबरोबर मन प्रसन्न करणाऱ्या विलोभनीय अशा या गोकाक फॉल्सचे रूप पाहण्यासाठी पर्यटकांचा गर्दी वाढू लागली,असून महाराष्ट्रातील काही हौशी पर्यटकांना गोकाक फॉल्सचे व्हिडीओ ईटीव्ही भारत सोबत शेअर केले आहे.Body:भारतातील नायगरा फॉल्स म्हणून ओळखला जाणारा कर्नाटक मधला गोकाक फॉल्स हा धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला आहे.कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाक जवळील असणाऱ्या कोन्नूर या ठिकाणी घटप्रभा नदीवर हा धबधबा आज देशभरात नव्हे तर जगभरात पर्यटकांना साद घालत असतो,१७१ फुटांवरून कोसळणारा धबधबा गोकाक फॉल्स म्हणून जगभरात ओळखला जातो.पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी लाखो पर्यटक अद्वितीय
धबधबा पाहण्यासाठी गर्दी करतात.यंदा उशिरा सुरू झालेल्या मान्सूनमुळे गोकाकचा धबधबा प्रवाहित होण्यास थोडा उशीर झाला असला तरी आता धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश मनमोहक आणि भुरळ घालणारा हा विशाल धबधबा चोही दिशेने पर्यटकांना पाहता येतो, विशेष म्हणजे जेथून हा धबधबा शेकडो फूट खाली कोसळतो त्या स्पॉट पर्यंत पर्यटकांना सहज पोहचतो येते.तर ज्या घटप्रभा नदीवरून हा धबधबा खाली कोसळतो, त्या धबधब्याच्या काही अंतरावर ब्रिटिशांनी एक पूल उभारला असून तो झुलता पूल म्हणून आज ओळखला जातो.आणि 659 फूट लांबीचा हा झुलता पूल आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. पाण्याचा कितीही मोठा प्रवाह असला तरी खडकांवर उभारलेला हा पूल अजूनही डगमग गेलेला नाही. गोकाकचा धबधबा जणू निसर्गाचा एक अद्भुत आविष्कार असाच म्हणावा लागेल,ज्या क्षमतेने हा धबधबा कोसळतो ते पाहून मनात धडक तर भरतेच,शिवाय डोळ्यांचे पारणे सुद्धा फिटते..Conclusion:
Last Updated : Jul 4, 2019, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.