ETV Bharat / state

साताऱ्यात आजीच्या अंत्यविधीला गेलेल्या कर्नाळाच्या एकास कोरोनाची लागण, सांगलीचा आकडा  ७ वर... - कर्नाळा सांगली

सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या कर्नाळ येथील एका व्यक्तीला कोरोना लागण झाली आहे. शनिवारी सदर व्यक्तीला जिल्हा प्रशासनाकडून तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर प्रशासनाकडून त्या व्यक्तीला आयसोलेशन कक्षामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

corona in sangli
corona in sangli
author img

By

Published : May 4, 2020, 11:56 AM IST

सांगली - कर्नाळ येथे एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सातारा येथे आजीच्या अंत्यविधीसाठी जाऊन आल्यानंतर सदर व्यक्ती हा कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांचा आकडा आता ७ वर पोहोचला आहे. तर, शहरापासून काही अंतरावरच आणखी एक कोरोना रुग्ण सापडल्याने सांगलीकरांची धाकधूक वाढली आहे.

सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या कर्नाळ येथील एका व्यक्तीला कोरोना लागण झाली आहे. शनिवारी सदर व्यक्तीला जिल्हा प्रशासनाकडून तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर प्रशासनाकडून त्या व्यक्तीला आयसोलेशन कक्षामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरचा व्यक्ती हा १८ एप्रिल रोजी सातारा जिल्ह्यात आपल्या आजीच्या अंत्यविधीसाठी गेला होता. त्या ठिकाणी त्या अंत्यविधी कार्यक्रमाला मुंबईहून आलेला त्याचा मावस भाऊ उपस्थित होता. त्या मावस भावाला कोरोना लागण झाल्याचे सातारामध्ये समोर आले होते. सातारा जिल्हा प्रशासनाकडून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोध घेण्यात आला होता. ज्यामध्ये सांगलीच्या कर्नाळमधील व्यक्तीही अंत्यविधी कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाकडून सांगली प्रशासनाला याबाबतची शनिवारी माहिती देण्यात आली होती.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कर्नाळ येथील "त्या"व्यक्तीला ताब्यात घेऊन मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल करत स्वॅब घेण्यात आले होते. रविवारी रात्री त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना म्हणून संबंधित कुटुंबाच्या वडिलांसह पत्नी व २ मुलांना आयसोलेशन कक्षात दाखल करत त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर, या कोरोनाबाधित रुग्णामुळे सांगली जिल्ह्याचे कोरोना रुग्णांची संख्या आता 7 वर पोहोचली आहे. रेड झोनवरून सांगली सध्या ऑरेंज झोनमध्ये आल्याने सोमवारपासून जिल्ह्यात शिथिलता देऊन काही दुकाने, उद्योग सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. असे असताना सांगली शहराच्या आसपास कोरोना संसर्ग वाढत असल्याने सांगलीकरांची धाकधूक वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.