ETV Bharat / state

प्रांताधिकाऱ्याकडून तीन तलाठ्यांना मारहाण - sangali

प्रांताधिकाऱ्याकडून तीन तलाठ्यांना मारहाण करण्यात आली आहे. नागेश पाटील यांच्यावर कारवाई न केल्यास सांगली जिल्ह्यातील तलाठी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

tehsil office, valva
तहसील कार्यालय, वाळवा
author img

By

Published : Mar 17, 2021, 2:34 PM IST

सांगली - इस्लामपूर प्रांताधिकारी यांच्याकडून तीन तलाठ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तलाठी संघाकडून करण्यात आला आहे.या मारहाण प्रकरणी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. बुधवारी कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील तलाठी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

वाळवा तालुक्यातल्या इस्लामपूरचे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी पूर्वग्रह दोषातून तीन तलाठ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने केला आहे. अविनाश पाटील, अमर साळुंखे आणि महादेव वंजारी या तीन तलाठ्यांना मारहाण करण्यात आली आहे. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी तीन तलाठ्यांना कार्यालयात बोलावून घेतले आणि शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तलाठी संघांच्या सांगली विभागाने केला आहे. तलाठी संघातफे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदनाद्वारे प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - गोरेगाव येथील भीषण आगीवर तब्बल अकरा तासानंतर नियंत्रण

नागेश पाटील यांचा नकार -

प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोडून काढले आहेत. आपण तीन तलाठ्यांना मारहाण केल्याचे आरोप त्यांनी खोडून काढले आहे. या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारपासून इस्लामपूर तहसील कार्यालयातील तलाठी आंदोलन करणार आहेत. पाटील यांच्यावर १८ मार्चपर्यंत कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील तलाठी बेमुदत काम संपावर जाणार आहेत.

हेही वाचा - नागपूर जिल्ह्यात 19 हजार अॅक्टिव्ह रुग्ण, कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.