ETV Bharat / state

राज्यात डॉक्टरांच्या कार्यप्रणालीचे ऑडिट होणे गरजेचे- मंत्री जयंत पाटील - minister jayant patil propose doctors audit

उपचाराविना रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे, आज खरे तर, डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे ऑडिट होणे गरजेचे आहे, या मताचा मी असून त्यामुळे जिल्ह्यात डॉक्टरांच्या प्रोसिजरचे ऑडिट करण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मंत्री जयंत पाटील
मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Sep 21, 2020, 4:07 PM IST

सांगली - रुग्णालयाच्या खर्चाचे ऑडिट करण्यासाठी सरकारने ऑडिटर नेमले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांच्या कार्यप्रणालीचे ऑडिट करण्याची गरज आहे, असे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. राज्यात विशेष करून सांगली जिह्याचा मृत्यूदर कमी का होत नाही, या प्रश्नावर पाटील यांनी हे मत व्यक्त केले.

माहिती देतान मंत्री जयंत पाटील

सांगलीमध्ये एका कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील आले होते. राज्याबरोबरच सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देश आणि राज्यापेक्षा सांगलीतला मृत्यूदर हा सर्वाधिक आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना जिल्ह्यात आणि राज्यात रुग्णांच्या उपचारानंतर बिलांबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे, राज्य सरकारकडून कोरोना रुग्णांच्या रुग्णालय बिलांचे ऑडिट करण्याची भूमिका घेण्यात आली.

जिल्ह्यातला मृत्यूदरही वाढला आहे. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यावर जयंत पाटील यांना प्रश्न करण्यात आला. त्यावर त्यांनी डॉक्टरांच्या कार्यप्रणालीचे ऑडिट करण्याचे मत व्यक्त केले.

उपचाराविना रुग्णांचा मृत्यू होत आहे, अशा अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे, आज खरे तर, डॉक्टरांच्या कार्यप्रणालीचे ऑडिट होणे गरजेचे आहे. या मताचा मी असून त्यामुळे जिल्ह्यात डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करण्याचा मानस असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केला.

हेही वाचा- रेमेडिसीवीर इंजेक्शन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक करवाई - राजेंद्र पाटील-यड्रावकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.