ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी पारधी समाजाने काढला अर्धनग्न मोर्चा - sangali marathi news

पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूरमध्ये पारधी समाजाने अर्धनग्न मोर्चा काढत आंदोलन केले आहे.

विविध मागण्यांसाठी पारधी समाजाने काढला अर्धनग्न मोर्चा

author img

By

Published : Feb 9, 2021, 5:40 PM IST

सांगली - पारधी समाजाच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूरमध्ये पारधी समाजाने अर्धनग्न मोर्चा काढत आंदोलन केले आहे. दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियान संघटनेच्या माध्यमातून इस्लामपूर तहसिल कार्यलयावर अर्धनग्न मोर्चा काढत, प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.

मधुकर वायदंडे
अर्धनग्न मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध-
वाळवा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पारधी समाज वास्तव्यास आहे. या समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजना आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून येथील पारधी समाजाला हक्काचे घर, जागा, मूलभूत सुविधा, मुलांना शिक्षण देण्यास प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियान संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. मधुकर वायदंडे व उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आणि प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर पारधी समाजाचा अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पारधी समाज या आंदोलनात सहभागी होते.
अन्यथा,तीव्र आंदोलन छेडणार-
2003 पासून पारधी समाजाचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. पारधी समाजाला घर मिळावीत, पारधी समाजाला पोलीसांकडून होणार नाहक त्रास थांबवावा, समाजाला गाव मिळावे, अश्या अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यामातून करण्यात आल्या. तसेच गेंड्याचे कातडीच्या प्रशासनाला जर जाग आली नाही. तर यापुढील काळात पारधी समाजाला घेऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी पारधी समाजाचे नेते मधुकर वायदंडे यांनी दिला आहे.

हेही वाचा- कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.