ETV Bharat / state

Unseasonal Rain in Sangli district : अवकाळीचा कहर, भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू; दोघे गंभीर

सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू ( Unseasonal Rain in Sangli District ) आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना हतनोली (ता. तासगाव) येथे घडली आहे. आळसंद (ता. खानापूर) येथे वीज पडून एक मोटारसायकल जळून खाक झाली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Apr 11, 2022, 5:06 PM IST

सांगली - सांगली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू ( Unseasonal Rain in Sangli District ) आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे घराची भिंत कोसळून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना हतनोली (ता. तासगाव) येथे घडली आहे. आळसंद (ता. खानापूर) येथे वीज पडून एक मोटारसायकल जळून खाक झाली आहे.

अवकाळीचा कहर

अवकाळीचा बळी, भिंत कोसळून वृद्ध ठार - मागील पाच दिवसांपासून अवकाळी पाऊसाचा तडाखा जिल्ह्याला बसत आहे. वादळी वारा, गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह हा अवकाळी पाऊस पडत आहे. याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. रविवारी (दि. 10 एप्रिल) मध्यरात्रीनंतर सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे. यामध्ये वादळी वाऱ्याने हातणोली येथील घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याने घरात झोपलेल्या एका कुटुंबातील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कमल नारायण माळी, असे मृत महिलेचे नाव आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकीवर कोसळली वीज - खानापूरच्या आळसंदमध्ये दुचाकीवर वीज पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये मोटार सायकल जळून खाक झाली आहे. हणमंत माळी यांनी अंगणात आपली दुचाकीवर लावली होती. यावेळी मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामध्ये वीज पडल्याने ती अक्षरश: जळून खाक झाली आहे.

अवकाळीचा शेतीला मोठा फटका - मागील पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीला बसला आहे. खरीप हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यासह फळबागांच्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घराच्या भिंती पडल्या आहेत, तर काही ठिकाणी पत्र्याचे छप्पर उडून गेल्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - Granddaughter Welcome : नातीच्या जन्माचा आनंद! हेलिकॉप्टरने घरी आणत केले स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.