सांगली - तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये एका युवकासह दोन युवतींचे मृतदेह आहेत. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (Three Bodies Shekoba hill in Manerajuri) विषारी औषध पिऊन ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर या मृतदेहांच्या जवळ चॉकलेट्स आणि पुष्पगुच्छही आढळून आले आहे. मात्र, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी येथील
शेख फरद्दीन बाबा (शेकोबा) डोंगरावर तिघांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये एक युवक आणि दोन युवतींचा यामध्ये समावेश आहे. हरीश हणमंत जमदाडे (वय २१ रा, मणेराजुरी) असे युवकाचे नाव असून एक युवती, (मूळ गाव जयगव्हाण ता. कवठेमहांका सध्या रा. मणेराजुरी) तर एका युवतीची अद्याप ओळख पटली नाही. या तिघांच्या मृतदेहाजवळ द्राक्षबागेसाठी वापरले जाणारे विषारी औषधाची बाटली सापडली आहे. तसेच, या मृतदेहा शेजारी चाॅकलेट्स,पुष्पगुच्छ आणि हार आढळून आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत येथील घटनेचा पंचनामा केला आहे.
हेही वाचा - Threat to Aaditya Thackeray : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्याला बंगळूरुमधून अटक