ETV Bharat / state

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची तहसीलदारास मारहाण, गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.

author img

By

Published : May 3, 2020, 7:12 PM IST

double Maharashtra Kesari Chandrahar Patil
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलावर तहसीलदार मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

सांगली - वाळू वाहतुकीच्या गाड्यांवर कारवाई केल्याच्या रागातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या विटा येथे तहसीलदारांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चंद्रहार पाटील यांच्यासह दोघांच्यावर विटा पोलीस ठाण्यात तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी गुन्हा दाखल केला आहे. या अगोदर चंद्रहार पाटील यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल साडे सात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी केला होता.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रहार पाटील यांच्याकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. विटा तहसील कार्यालयाच्या आवारातच चंद्रहार पाटील यांनी तहसीलदार शेळके यांना आपल्या साथीदाराच्या मदतीने मारहाण केली आहे. काही दिवसांपूर्वी विट्याचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली होती. त्यामध्ये चंद्रहार पाटील यांच्याही वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा समावेश होता.

गाड्यांवर तब्बल साडे सात लाख रुपयांचा दंड तहसीलदार शेळके यांनी केला होता. तर हा दंड कमी करावा अशी मागणी वारंवार चंद्रहार पाटील यांच्याकडून तहसीलदार शेळके यांच्याकडे करण्यात येत होती. मात्र, तहसीलदार शेळके यांनी चंद्रहार पाटील यांच्या मागणीला दाद न देता, सर्व दंड भरा अशा सूचना दिल्या होत्या. हाच राग मनात धरून आज दुपारी चंद्रहार पाटील हे विटा तहसील कार्यालयात पोहचले. तहसीलदारांना पुन्हा दंड कमी करण्याच्या मागणी करू लागले. यातून चंद्रहार पाटील आणि तहसीलदार शेळके यांच्यात वादावादी झाली, त्यातून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या साथीदाराने तहसीलदार शेळके यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत शेळके यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह त्यांच्या साथीदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्यानुसार उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.