सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव यंदा रद्द झाला आहे. साध्या पद्धतीने दीड दिवसांच्या तासगाव गणपतीचे विसर्जन करण्यात आले आहे. तर
परंपरे प्रमाणे रथोत्सवा ऐवजी मोटारीतून भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणुन प्रशासनाकडून तासगाव येथील ऐतिहासिक रथ उत्सव रद्द करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत राजेंद्र पटवर्धन आणि आदिती पटवर्धन यांनी कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन चालू वर्षी रूढी परंपरेप्रमाणे रथोउत्सव मिरवणूक न काढता केवळ साध्या पद्धतीने गणेश मूर्तीची पूजा करण्याचा निर्णय घेतला, यामुळे 240 वर्षाची परंपरा असलेल्या तासगावच्या रथोत्सवमध्ये यंदा खंड पडला आहे.
तासगावच्या ऐतिहासिक रथ उत्सव तिसऱ्यांदा रद्द होत आहे. यापूर्वी 1942 आली स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी रथोत्सवावर बंदी आणली होती. 1972 मध्ये दुष्काळाच्या कारणामुळे रथोत्सवावर रद्द करण्यात आला होता. तर यंदा कोरोनाच्या महामारीमुळे रथोत्सव रद्द झाला आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा रथोत्सवात खंड झाला आहे.
तासगावच्या गणपतीचे दीड दिवसांनी दगडी चाक आणि भव्य लाकडी रथामधून विसर्जन करण्याची परंपरा आहे. हजारो भाविक या दिवशी रथ ओढण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजेरी लावतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथोत्सव रद्द करून मोटार मधून विसर्जन करण्यात आले. भक्तीमय वातावरणात तासगावच्या लाडक्या बाप्पांना निरोप दिला आहे. तासगाव गणपती मंदिराचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांच्यासह मोजक्याच मंडळीच्या उपस्थित श्रीची विधीवत पूजा करण्यात आली. त्या नंतर पालखी मोटारी पर्यंत काढण्यात आली आणि गणेश मंदिरापासून मोटारीतून गणेश मूर्ती काशी विश्वेश्वराच्या मंदिरा पर्यंत सजवलेल्या मोटारातून नेऊन विसर्जन दीड दिवसांच्या गणपतीला निरोप देण्यात आला.