सांगली - जिल्ह्यात शिंदी आणि ताडी-माडी दारुमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू असल्याचा आरोप करत, कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
भेसळयुक्त विक्री होत असूनही कारवाई नाही -
सांगली जिल्ह्यातील अनेक शिंदी आणि ताडी-माडी दारु दुकानांमध्ये भेसळ सुरू करण्यात येत असून, याबाबत प्रत्यक्ष एका भेसळ करणाऱ्या अड्ड्यावर जाऊन हा सर्व प्रकार सामजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी उघडकीस आणले आहे. याबाबतीत पुरावे ही राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत जिल्ह्यातील सर्व शिंदी आणि ताडी-माडी दारुची दुकाने बंद करावे, तसेच भेसळ करणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जयश्री पाटील यांनी सांगलीतील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा - पाकिस्तानातून परतलेल्या गीताचा परिवार शोधण्यासाठी परभणीतून होणार 'कॅम्पेनिंग'