ETV Bharat / state

Inquiry By District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीची स्थगिती पुन्हा उठवली

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ( Sangli District Central Bank ) चौकशीला ( inquiry by the District Central Bank ) असणारी स्थगिती पुन्हा एकदा राज्य सरकारने उठवली आहे. त्यामुळे आता बँकेची चौकशी ( inquiry by Sangli District Central Bank ) पुन्हा सुरू होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 30, 2022, 9:23 PM IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीची स्थगिती पुन्हा उठवली

सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ( Sangli District Central Bank ) नोकर भरती घोटाळा, ( Sangli District Central Bank Recruitment Scam ) अनियमित कर्ज वाटप, गैरकारभारा विरोधात ( Sangli District Central Bank Mismanagement ) आघाडीच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, पुन्हा स्थगिती देण्यात आली होती. आता सरकारने या चौकशीवरील ( inquiry by Sangli District Central Bank ) स्थगिती उठवल्याने संचालक मंडळांचे धाबे दणाणले आहे.

बँकेत नोकर भरती घोटाळा - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी,भाजप काँग्रेस असे एकत्रित सत्ता आहे. तत्कालीन बँकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप पाटील यांच्या कारकीर्दमध्ये बँकेत नोकर भरती घोटाळा, अनियमित कर्ज वाटप, गैरकारभार झाल्याचा आरोप आहे. हे आरोप स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी याबाबत सहकार विभागाकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली होती.

चौकशीला सहकार विभागाकडूनचं स्थगिती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्या मध्यवर्ती बँकेतल्या संचालकांनी सध्याचे बँकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बँकेच्या चौकशीचे आदेश दिले होते. सहकार विभागाकडून सर्व आरोपांच्या बाबतीत समिती गठीत करून चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा या चौकशीला सहकार विभागाकडूनचं स्थगिती देण्यात आली होती.

बँकेच्या चौकशी पुन्हा होणार - याच मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन बँकेच्या चौकशीची असणारी स्थगिती उठवावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता सहकार विभागाकडून बँकेच्या चौकशीची असणारी स्थगिती ही उठवण्यात आलेली आहे. पुन्हा आता या बँकेच्या चौकशीचे कार्यवाही सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाकडून जिल्हा निबंधक कार्यालयाला देण्यात आले आहेत.

सहकार क्षेत्रात खळबळ - खाली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस, भाजपाचे खासदार संजयकाका पाटील गटाचे सत्ता आहे या ठिकाणी सध्या शिराळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मानसिंगराव नाईक हे अध्यक्ष आहेत. तर काँग्रेसच्या नेत्या जयश्री पाटील या उपाध्यक्ष आहेत. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीचे पुन्हा एकदा आदेश आल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या संचालक मंडळ आणि जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.