ETV Bharat / state

Sangli News: तीन माणसांच्या गुऱ्हाळघरातून, तिप्पट फायदा मिळवणारा शेतकरी - गुऱ्हाळ घराची काहाणी

सेंद्रिय गूळ निर्मितीच्या व्यवसायामुळे गेल्या चार वर्षांपासून आपला नफा आणि उत्पन्न हे तिप्पट झाले, असे शेतकरी ते उद्योजक बनलेले सुहास पाटील यांनी सांगितले.पाहूया तीन माणसांच्या माध्यमातून तिप्पट फायदा मिळवून देणाऱ्या गुऱ्हाळ घराची काहाणी काय आहे.

A farmer who gets three times the profit
गुऱ्हाळघरातून तिप्पट फायदा मिळवणारा शेतकरी
author img

By

Published : Feb 27, 2023, 3:58 PM IST

गुऱ्हाळघरातून तिप्पट फायदा मिळवणारा शेतकरी

सांगली: सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या औदुंबर येथील शेतकरी सुहास पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून, गुऱ्हाळघर निर्माण करून आपली आर्थिक प्रगती साधली आहे. केवळ तीन माणसांच्या माध्यमातून पाटील यांचे गुऱ्हाळ घर चालते. ज्यामुळे सुहास पाटलांना आता तिप्पट उत्पन्न मिळत आहे. सेंद्रिय ऊस त्यातून सेंद्रिय गूळ आणि गुळाचे पदार्थ बनवून स्वतःच्या गूळ प्रॉडक्टचे ब्रॅण्डिंग देखील पाटील यांनी केले आहे. सुहास पाटील यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. ज्यामध्ये ते ऊसाचे आणि हळद पिकाचे उत्पादन घेतात. साडेतीन एकर क्षेत्रावर पाटील ऊसाची शेती करत त्यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. ऊसाची कमी एफआरपी आणि तेही तीन टप्प्यात मिळणारे पैसे, यामुळे पाटील यांनी सुरूवातीला छंद म्हणून फोटोग्राफी हा व्यवसाय सुरू केला, हे करत असताना त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करायचे ठरवले.

उसावर प्रक्रिया करून गूळ तयार: सुहास पाटील यांनी सेंद्रिय ऊसाची शेती केली. त्यानंतर कारखान्याला ऊस पाठवण्याऐवजी गुऱ्हाळघरातून गूळ तयार करून विक्री करण्याचा व्यावसाय चालू केला होता. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले. कधी गुळाला दर मिळत नाही, तर कधी गूळ शिल्लक राहून खराब होऊन जायचा. ऊस पिकवला की, तो साखर कारखान्यामध्ये द्यावा लागतो. पण त्या तुलनेने पैसे कमीच मिळतात. तर गूळ करायचा झाला तर दुसऱ्याच्या गुऱ्हाळघरामधून गूळ तयार केला, तर ज्यादाचा फायदा मिळत नाही. सुहास पाटलांनी स्वतःच्याच उसावर प्रक्रिया करून गूळ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण गुऱ्हाळघर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखोंचं भांडवल आणि मनुष्यबळ लागते. एका गुऱ्हाळ घरामध्ये किमान 20 ते 25 माणसे कामासाठी लागतात. मग ऊस तोडणीपासून उसाचा रस करणे, पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करणे, अशा सर्व कामांसाठी अधिकचे मनुष्यबळ लागते.

गुळाचे विविध पदार्थ: सुहास पाटील यांनी नॅनो पध्दतीने 3 माणसांच्या जीवावर चालणारे गुऱ्हाळघर निर्माण केले आहे. ज्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न आणि नफा वाढला आहे. सुहास पाटील हे आता दररोज सव्वा टन ऊस गाळप करतात. एक टन उसापासून सुमारे 120 किलो गूळ तयार होतो. ज्याला सरासरी 100 रुपये प्रति किलो दर आहे. ज्यामध्ये छोटी गुळाची ढेप, गूळ पावडर, काकवी, गूळ कॅण्डी बनवतात. केवळ ही बाय प्रॉडक्ट बनवणे इथपर्यंतच न थांबतात पाटील यांनी स्वतःच या मालाची विक्री सुरू केली. गोपालनंदन या ब्रँडच्या नावाखाली सुहास पाटलांचे वेगवेगळे गुळाचे पदार्थ बाजारात विकले जातात. शिवाय त्यांनी आपल्या गुऱ्हाळ घराच्या बाहेरच रस्त्याच्या कडेला दुकान देखील सुरू केला आहे. गुळ खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला गुऱ्हाळघरामध्ये गूळ कसा बनवला जातो, ते देखील दाखवले जाते.

सेंद्रिय गूळ खाण्याकडे कल वाढला : उसाचे आणि गुऱ्हाळ घरातल्या त्यांच्या गुळाचे आर्थिक गणित मांडताना सुहास पाटील सांगतात, एक टन ऊस जर साखर कारखान्याला पाठवला तर त्याच्यातून 3000 रुपये मिळतात, मात्र आपण आपल्या गुऱ्हाळ घरामध्ये एक टन ऊस गाळल्यास त्यातून 100 किलो 120 किलो गुळ तयार होतो. हा सेंद्रिय पद्धतीचा आणि कोणत्याही रासायना शिवाय बनवलेले गूळ आहे. त्यामुळे या गुळाला आणि त्याच्या पदार्थांना 100 ते 120 वीस रुपये किलो दर मिळतो. लोकांना सेंद्रिय पद्धतीचा आणि रासायन विरहित गुळ खाण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे गुळाला इतका दर मिळतो आणि कारखान्याला पाठवण्यात येणार ऊस आणि प्रक्रिया करून तयार करण्यात आलेल्या गुळ यातला फरक काढल्यास शंभर रुपये किलो प्रमाणे,1 टन उसातून दहा हजार मिळतात. खर्च जरी 50 टक्के धरल्यास 50 टक्के नफा राहतो, असा दावा सुहास पाटील करतात.

अधिकचा नफा: एवढ्या छोट्या प्रमाणात गुऱ्हाळघर होऊ शकते हे कोणालाही पटत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आमच्या गुऱ्हाळ घराला भेट देतात. अल्पभूधारक असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून स्वतःचा नॅनो पद्धतीचा गुऱ्हाळ घर उभे केल्यास त्यांना अधिकचा नफा नक्कीच मिळू शकतो. या नॅनो गुऱ्हाळ घरात गुळाची प्रक्रिया करणे खूपच सोपी आहे. अगदी महिला देखील हे सर्व काही करू शकतात,असा दावा देखील सुहास पाटील करतात.

हेही वाचा: Sangli News कौतुकास्पद मुलीसाठी चक्क मुलगा दिला दत्तक ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.