ETV Bharat / state

येडेनिपाणीच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याने घेतले एकरी 130 टन उत्पादन

ऊसाच्या उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर मानला जातो. नवनवीन प्रयोग करून येथील शेतकरी शंभर टनांच्या पुढे उसाचे उत्पादन घेतात. वाळवा तालुक्याच्या येडेनिपाणी येथील अमर पाटील या शेतकऱ्याने एकरी 130 टनाचे उत्पादन घेतले आहे.

author img

By

Published : Jan 7, 2021, 8:37 PM IST

सांगली
सांगली

सांगली - पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर मानला जातो. नवनवीन प्रयोग करून येथील शेतकरी शंभर टनांच्या पुढे उसाचे उत्पादन घेतात. वाळवा तालुक्याच्या येडेनिपाणी येथील अमर पाटील या शेतकऱ्याने एकरी 130 टनाचे उत्पादन घेतले आहे.

सांगली

शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो, जसजसे उत्पादन वाढत जाईल, तसे अधिकाधिक नावीन्यपूर्ण प्रयोग करून आणखी उत्पादनात वाढ, कशी करता येईल, यासाठी शेतकरी झटत असतो. येडेनिपाणी येथील अमर पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी देखील या पैकीच एक आहेत. अमर पाटील तसे ऊस शेतीत तरबेज आहेत. आत्तापर्यंत ते एकरी 40 टनांपर्यंत असलेले उत्पादन 130 टनांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाले आहे. आता एकरी 151 टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे.

विविध गोष्टींचे काटेकोर नियोजन..

येडेनिपाणी गावातील अमर तात्यासाहेब पाटील हे पट्टीचे ऊस उत्पादक शेतकरी. त्यांचे वडील व दोन चुलते यांची एकत्रित जवळपास 38 एकर शेती आहे. जमिनीचे क्षेत्र जास्त असले तरी उत्पन्न कमी होते. काही जमिनी पडीक होत्या. अमर यांनी बारावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पडीक जमिनींची उत्तम मशागत करून लागवडी योग्य बनवल्या, एकत्र कुटुंबातील तीन विहिरींची खोदाई केली. पाणीस्त्रोत वाढवले पाईपलाइन, संपूर्ण क्षेत्रात ठिबक ही कामे टप्या-टप्प्याने पूर्ण करून ऊसशेती सुरू झाली.

आता 151 टन उत्पादनाचे ध्येय..

पूर्वीच्या काळात या जमिनीत एकरी 30 ते 40 टनच ऊस पिकायचा अमर परिसरातील कै. राजारामबापू सहकारी ऊस कारखान्याच्या संपर्कात आले. त्यातून शास्त्रीयदृष्टया व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन मिळाला. मग प्रयोगांची गोडी वाढली, व्यवस्थापनात बदल करीत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत एकरी 60 ते 65 टन व पुढे 90 ते 95 टन उत्पादनापर्यंत मजल मारली. अलीकडील काही वर्षांत एकरी 120 टन उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यात ते यशस्वी झाले.

अमर पाटील यांनी आता तर एकरी 151 टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे. अमर पाटील यांची प्रयोगशीलता आणि ऊस शेतीतील धडपड व सातत्याने केलेले प्रयत्न यांची दखल घेत अमर यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे.

अमर पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी परिसरातील अनुभवी शेतकऱ्यांकडील चांगल्या बेण्याची निवड.

उसात शक्यतो आंतरपीक घेणे टाळले जाते, मात्र घरगुती वापरासाठी भुईमूग किंवा अन्य पिकांची थोड्या क्षेत्रात लागवड.

वेळोवेळी माती परीक्षण, मातीचा सेंद्रिय कर्ब 0.7 टक्के.

दोनवेळा पाचट काढले जाते, त्याची कुट्टी करून वापर होतो.

ऊस व्यवस्थापनातील ठळक बाबी..

उसाचा खोडवा ठेवणे. पण तो तुटल्यानंतर पुन्हा नेडवा ठेवत नाहीत. त्यावर हळदीची फेरपालट करतात. हळदीचेही ते एकरी 25 ते 30 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतात.

हळदीचे पीक निघाल्यानंतर जेवढे उसाचे क्षेत्र आहे. तेवढ्या भागात ताग किंवा ध्येचा (4 ते 5 एकर) घेण्यात येतो. त्यावर रोटावेटर फिरवला जातो.

एकरी 25 टन कंपोस्ट विस्कटले जाते. तीन टन कोंबडी खत व कारखान्याची राख (सिलीकॉनसाठी) दोन टन विस्कटली जाते.

पुन्हा नांगरट, सरी सोडून रान तापवले जाते, जूनचा पहिला आठवडा किंवा मेच्या अखेरच्या आठवड्यात लागवड केली जाते, दहा महिन्यांचे निवडक बियाणे वापरतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.