ETV Bharat / state

पूरबाधितांना 10 हजार रूपयांची तत्काळ मदत - सुभाष देशमुख

सुभाष देशमुख यांनी ब्रम्हनाळच्या पूरग्रस्तांची वसगडे येथे आणि नागठाणे, कसबे डिग्रज, दुधगावच्या पूरग्रस्तांची आष्टा येथे भेट घेवून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पूरबाधितांना शासन, जिल्ह्यातील संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, असा धीर दिला.

सुभाष देशमुख
author img

By

Published : Aug 10, 2019, 10:58 AM IST

सांगली - सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणावर लोकांना बसल्याने तत्काळ 10 हजार रूपयांची तात्पुरती मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पंचनामे करून निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल, असे राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री व सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सुभाष देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील अंकलखोप व परिसरातील 8 ते 10 गावांचा दौरा केला. यामध्ये अंकलखोपसह दुधोंडी, दह्यारी, तुपारी, घोगाव, बुर्ली आणि नांद्रे या गावांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली व पूरबाधितांना दिलासा दिला. तसेच ब्रम्हनाळच्या पूरग्रस्तांची वसगडे येथे आणि नागठाणे, कसबे डिग्रज, दुधगावच्या पूरग्रस्तांची आष्टा येथे भेट घेवून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पूरबाधितांना शासन, जिल्ह्यातील संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, असा धीर दिला.

यावेळी पूरबाधितांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पीक कर्ज मिळावे, घरे मिळावीत, जनावरांसाठी नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या केल्या. दौऱ्यादरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पाटील यांनी पूरक्षेत्राची माहिती दिली. दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग नवीन कुमार, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम आदि उपस्थित होते.

अलमट्टी धरणातून सुमारे साडेचार लाख क्युसेक्स विसर्ग करण्यात येत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा हे एकमेकांशी समन्वय ठेवून आहेत. शासन पूर्ण गांभीर्याने ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वांनी मिळून या संकटातून मार्ग काढूया. यासाठी सर्वांचे सहकार्य आहे. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.

Intro:mh_sol_04_subhash_deshmukh_on_flood_7201168

पूरबाधितांना १० हजार रूपयांची तात्काळ मदत - मदत व पूर्नवसन मंत्री सुभाष देशमुख
एकमेकांच्या सहाय्याने पूरग्रस्तांना आधार देण्याचे आवाहन
सांगली-
सांगली जिल्ह्यावर आलेले पूराचे संकट खूप मोठे असून सर्वांनी संवेदनशीलपणे राहून एकमेकांना आधार देवू या व पूरबाधितांच्या पाठीशी राहूया असे आवाहन राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री व सांगलीचे पालकमंत्री यांनी केले आहे.
Body:सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराचा फटका मोठ्या प्रमाणावर लोकांना बसल्याने तात्काळ १० हजार रूपयांची तात्पुरती मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून पंचनामे करून निकषाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल, असे सहकार, मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील अंकलखोप व परिसरातील ८ – १० गावांचा दौरा केला. यामध्ये अंकलखोपसह दुधोंडी, दह्यारी, तुपारी, घोगाव, बुर्ली आणि नांद्रे या गावांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली व पूरबाधितांना दिलासा दिला. तसेच ब्रम्हनाळच्या पूरग्रस्तांची वसगडे येथे आणि नागठाणे, कसबे डिग्रज, दुधगावच्या पूरग्रस्तांची आष्टा येथे भेट घेवून परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी पूरबाधितांना शासन, जिल्ह्यातील संपूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका असा धीर दिला.

यावेळी पूरबाधितांनी मृतास ५ लाखांची मदत, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने पीक कर्ज मिळावे, घरे मिळावीत, जनावरांसाठी नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या केल्याचे सांगितले. दौऱ्यादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पाटील यांनी पूरक्षेत्राची माहिती दिली. दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग नवीन कुमार, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम आदि उपस्थित होते.
अलमट्टी धरणातून सुमारे साडेचार लाख क्युसेक्स विसर्ग करण्यात येत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस.येडियुरप्पा हे एकमेकांशी समन्वय ठेवून आहेत. शासन पूर्ण गांभीर्याने ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्वांनी मिळून या संकटातून मार्ग काढूया. यासाठी सर्वांचे सहकार्य आहे. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केले.

Conclusion:
नोट- ही बातमी सांगलीतील आहे. सूभाष देशमुख यांच्या कार्यालयाकडून ही बातमी आली आहे. त्यामुळे ही बातमी पाठवित आहे. बातमी टॅग करत असतांना सांगलीमध्ये टॅग करावी ही विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.