सांगली - अजानवरून शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा भाजप राजकारण करत आहे. हे धोकादायक आहे. शिवसनेने केवळ होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवले आहे. भाजपला अजानवर आक्षेप असल्यास त्यांनी त्यांच्या केंद्र सरकारकडे तशी मागणी करावी, असे मत मुस्लीम समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असिफ बावा यांनी व्यक्त केले आहे.
मुस्लीम समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते असिफ बावा यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. अजानचा हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तो काही नवा नाही. शिवसेनेच्या आताच्या भूमिकेचा विचार केला तर महाराष्ट्रातील मुस्लीम समाजाबाबतीत शिवसेना आणि नेत्यांची भूमिका सॉफ्ट झाली आहे, असे बावा म्हणाले. त्यामुळे भाजपाच्या पोटात दुखू लागले आहे, असा टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा-लाऊडस्पीकरवर अजान लावणे इस्लामचा भाग नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्वाळा..
भाजपाकडून केवळ अजानचे राजकारण
मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे सरकार आणि पक्ष वेगळे आहेत. सरकारमध्ये आल्यानंतर सर्व जाती-धर्माच्या बाबतीत सरकारला आदर असणे आवश्यक आहे. शिवसेनेकडून हा आदर राखला जात आहे. पण भाजपाकडून केवळ अजान राजकारणाचा मुद्दा करण्यात येत आहे, असा आरोप बावा यांनी केला.
हेही वाचा-अजान स्पर्धा प्रकरण : एखाद्या कलेला धर्माशी जोडणे अतिशय चुकीचे - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव
शिवसेनेचे मुंबईमधील नेते दत्तात्रय सकपाळ यांनी अजान स्पर्धा घेतली पाहिजे, असे मत व्यक्त करत नवा वाद निर्माण केला. सकपाळ यांच्या अजान स्पर्धा या विधानानंतर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्यात येत आहे. शिवसेनेने हिंदुत्त्व,भगवा सोडला आहे का ? अशा अनेक मुद्द्यांवर भाजपाकडून ट्रोल करण्यात येत आहे. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना पेपरच्या अग्रलेखामधून भाजपावर जोरदार टीका करत अजानबाबत केंद्राने ध्वनी प्रदूषण होत असल्याने बंदी घालायचा निर्णय घावा, अशी मागणी केली.
अजानवरून सामना आणि शिवसेनेची प्रतिक्रिया भिन्न
अजानवरून शिवसेनेच्या नेत्यांनी प्रत्यक्ष व्यक्त केलेली भूमिका आणि सामानाच्या अग्रलेखातून जाहीर केलेली भूमिका ही वेगवेगळी आहे. तसेच भाजपाकडून अजान प्रकरणी शिवसेनेवर केली जाणारी जहरी टीका यावरून मुस्लीम समाजातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.
- सोलापूर
एकमेकांच्या धर्माचा आदर करणे हेच 'हिंदुत्त्व' - जुबेर बागवान
दक्षिण मुंबई येथील अजान स्पर्धा प्रकरणात भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे. यावर सोलापूर येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी जुबेर बागवान यांनी ट्रोल करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे, आणि गरज पडल्यास मदत करणे, हा एक प्रकारे हिंदुत्त्वाचाच भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
दक्षिण मुंबई येथील अजान स्पर्धा प्रकरणावरून भाजप आणि शिवसेना यामध्ये हिंदुत्ववाद निर्माण झाला आहे. ट्रोल करत दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. पण मुस्लीम नेते बाजूलाच राहिले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांना टीका करण्याअगोदर हे देखील पाहणे महत्वाचे आहे. या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजून घेतली आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून मतांचे राजकारण केले आहे. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे हे देखील महत्त्वाचे आहे.
संविधानाने प्रत्येक धर्माला आपाल्याला धर्मानुसार राहण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा हक्क दिला आहे. तसेच एकमेकांच्या धर्माचा आदर करा, असे देखील भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला सांगितले आहे. पण धर्माचा आधार घेत अनेक सत्तांतरं झाली. सत्तेत आल्यावर प्रत्येक सरकारला सर्व धर्मांचा आदर करावा लागतो, असे बागवान म्हणाले.
- मुंबई
गीतापठण कार्यक्रमात मुस्लीम मुलींनी मिळवलेली पारितोषिकं भाजप विसरला
शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला आहे. मात्र, सोलापूर व इतर जिल्ह्यात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लीम मुलींनी पहिला क्रमांक पटकावल्याची आठवण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी करून दिली आहे. दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमांमध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. हे करताना त्यांनी मंदिरांमधील अनेक सीनही केले आहेत. याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केलं, असा होत नाही. असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
सामनच्या अग्रलेखाचे मुस्लिमांकडून स्वागत
सामना वृत्तपत्रातील अग्रलेखाचे स्वागत करत असल्याचे मुस्लीम बांधवांनी सांगितले. अजान स्पर्धेला शिवसेना नेत्यांनी समर्थन केले यात चुकीचे काय आहे. अनेक धर्मांचे लोक राजकारण्यांकडे जातात. त्यांची मदत घेतात. याबाबत पक्षांनी घाणेरडे राजकारण थांबवले पाहिजे. भारतातील मुस्लीम हा भारतीयच आहे, असे शिवसेनेने त्यांच्याबाबत कोणतीही हीन भावना ठेवली नाही.असे मुखपत्रात म्हटले आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मुस्लीम कार्यक्रमांना मदत केली. भारत हा देश संविधानाने चालतो. शिवसेनेची भूमिका ही घटनेला पकडूनच आहे. यामुळे याचे राजकारण करणाऱ्या पक्षांनी त्यांचे हे थांबवले पाहिजे, असे प्रोग्रेसिव्ह मुस्लीम फ्रंटचे अध्यक्ष निसार अली यांनी सांगितले.
![अजान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sng-03-aajan-issue-7203751_03122020204457_0312f_03509_263.jpg)
शिवसेनेचा यू-टर्न?
अजानचा आवाज हा माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचतो. तो आवाज ऐकून कानाला बरे वाटते. काही दिवसांपूर्वी शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी 'अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनीटांच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे', असे सांगितले. मात्र आता ते वक्तव्यावरून यू-टर्न घेत आहेत. असा कोणता आवाज झाला, ज्याने सकपाळ यांना त्रास द्यायला सुरुवात केली. हा आवाज कोणता आहे, देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेला हे जाणून घ्यायचे आहे. याचे उत्तर सकपाळ यांनी दिले पाहिजे, असे मौलाना मुफ्ती मंजुर यांनी म्हटले.
- नाशिक
धर्मगुरू आणि मुस्लीम बांधवांनी यावर आक्षेप घेत या राजकारणात आम्हाला कोणताही रस नसून 'अजानवरून राजकारण नको', अशी भूमिका घेतली आहे. आजनची नमाज म्हणजे 'अल्लाह की इबादत' असते. शिवसेना अजान स्पर्धा भरवत असेल तर त्यांतून चांगला संदेश जाईल, असे धर्मगुरूंनी सांगितले.
अजानची नमाज लाऊड स्पीकरवरून देण्यामागील महत्त्वअजान म्हणजे अल्लाहची इबादत करणं होय. ज्या प्रकारे हिंदू धर्मात भगवतगीतेत चांगला समाज घडवण्यासाठी संदेश देण्यात आला आहे. त्याच प्रकारे अजान नमाजमध्ये देखील आहे. काही लोक अजानमध्ये अकबर बादशहाचे नाव आहे म्हणून टीका करतात. मात्र अजान त्यांना अजानचा खरा अर्थ समजला नसल्याचे मुस्लीम धर्मगुरूंनी सांगितले.