सांगली - जत तालुक्यातील एकुंडी येथे एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे.नवविवाहित तरुणी व तरुण प्रेमवीराने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.आप-आपल्या घरात दोघांनी विष पिऊन आपले जीवन संपवले आहे.या घटनेमुळे जत तालुक्यातील एकच खळबळ माजली आहे.
विरहातून प्रेमीयुगलाची आत्महत्या - एकुंडी येथील लक्ष्मण संभाजी शिंदे, वय 22 आणि नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी वय 21,अशी या प्रेमींची नावे आहेत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. सहा दिवसांपूर्वी म्हणजे 1 जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील तरुणाशी झाला होता. त्यामुळे दोघांच्यामध्ये विरह निर्माण झाला होता. आश्विनी ही रविवारी आपल्या माहेरी एकुंडी येथे आली होती. सोमवारी सकाळच्या सुमारास आश्विनीने आपल्या घरात तर लक्ष्मण याने आपल्या घरात विष घेतले.
फोन करुन घेतला निर्णय - काही वेळात दोघांना त्रास होऊ लागला. त्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वी
आश्विनी आणि लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. प्रेम विरहातून त्यांनी एकमेकांना फोन केला. फोनवरूनच निर्णय घेत आपले जीवन संपवल्याची चर्चा गावात सुरू आहे. गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून, तपास पोलिस करीत आहेत.
हेही वाचा - 'तोडेंगे दम मगर साथ ना छोडेंगे', अपघातात तिघा मित्रांचा मृत्यू