सांगली - युतीचे काय होईल माहित नाही, पण झाली तरी आणि तुटली तरी शिवसेना आपले सामर्थ्य दाखवून देईल, असा अप्रत्यक्ष इशारा शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावत यांनी भाजपला दिला. यावेळी शिवसैनिकांची खरडपट्टी काढत शिस्त पाळण्याचा सल्लाही दिला आहे. ते आज सांगलीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.
हेही वाचा - सांगली विधानसभेची उमेदवारी दादा घराण्यातच द्या, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक
सांगलीत बुधवारी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला.
यावेळी रावते म्हणाले, विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. आजच्या मेळाव्याची वेळ 11 वाजताची होती, तुम्ही 12 वाजता येता, हे बरोबर नाही. शिवसेना कार्यकर्त्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. शिस्त हीच शिवसेना आहे. तसेच वेळाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना मागे बसवा आणि त्यांना हार घाला, अशा शब्दात रावते यांनी शिवसैनिकांना सुनावले.
हेही वाचा - पावसाळ्यात दुष्काळ... पाणी टंचाईच्या संकटाने सांगलीतील दुष्काळग्रस्त करतायेत स्थलांतर