ETV Bharat / state

खानापुरात पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला, अनिल बाबर तब्बल 26 हजार 291 मतांनी विजयी - Shiv Sena won in Khanapur assembly elections

सांगली जिल्ह्यातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख १६ हजार ९७४ मते मिळाली.

अनिल बाबर खानपूर मतदार संघातून विजयी
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:09 PM IST

सांगली - आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विजयाने खानापूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार बाबर यांनी विटा शहर वगळता मतदारसंघाच्या सर्वच भागात मताधिक्क्य घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. आमदार अनिलभाऊ बाबर यांना 1 लाख 16 हजार 974 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना 90 हजार 683 इतकी मते मिळाली. आमदार बाबर हे तब्बल 26 हजार 291 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार बाबर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना सलग दुसर्‍यांदा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत करत इतिहास घडवत करू या जागर पुन्हा बाबर असा नारा दिला.

आज गुरूवारी सकाळी 8 वाजता येथील शासकीय धान्य गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शंकर बर्गे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत नागेवाडी जिल्हा परिषद गटात आमदार बाबर यांनी मताधियय घेतले दुसर्‍या फेरीत देखिल आमदार बाबर हेच आघाडीवर होते. त्यानंतर माजी आमदार पाटील यांचे प्राबल्य असलेल्या विटा शहरात पाटील यांनी नाममात्र मताधियय घेतले. त्यानंतर चौथ्या फेरीपासून अठराव्या फेरीअखेर आमदार बाबर यांनी प्रत्येक फेरीत दिड ते दोन हजार मतांचे मताधिक्क्य घेत आघाडी कायम ठेवली. टपाली मतदानात देखिल आमदार बाबर यांना 574 मतांचे मताधियय मिळाले. आमदार बाबर यांना नागेवाडी जिल्हा परिषद गट, भाळवणी जिल्हा परिषद गट, तासगाव तालुययातील विसापूर सर्कल आणि लेगरे जिल्हा परिषद अशा सर्वच भागात मताधियय मिळाले तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना विटा शहरात सुमारे 5 हजार 600 चे मताधिक्क्य मिळाले. तरी देखिल आमदार बाबर यांना आटपाडी तालुक्याची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी 11 व्या फेरीअखेर सुमारे 8 हजार 582 मतांचे मताधियय मिळाले होते. आटपाडी तालुययात आमदार बाबर यांना सुमारे 17 हजार 709 इतके मताधिक्क्य मिळाल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे बाबर यांच्या विजयात आटपाडी तालुक्याने मोठे योगदान दिल्याचे स्पष्ट होत आहे.

आमदार बाबर यांच्या विजयात सेना भाजपा युतीने एकसंघ राहून काम केले. त्यामध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावली होती खानापूर घाटमाथ्याचे नेते सुहास शिंदे यांनी सुरवातीलाच पाठींबा दिला होता. तर आटपाडी तालुययात भाजपा नेते माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर यांचीही युतीधर्म म्हणून आमदार बाबर यांना मोलाची साथ मिळाली. तर आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील यांनी प्रचाराची सर्व धुरा खांद्यावर घेतली होती. काँग्रेसचे युवा नेते जयदीप भोसले व राष्ट्रवादीचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनीही बाबर यांना पाठबळ देण्याची भुमिका घेतली. विसापुर सर्कल मध्ये खासदार संजयकाका पाटील गटासह स्व. आर.आर.पाटील यांना मानणार्‍या त्यांच्या समर्थकांनी आमदार बाबर यांना या निवडणूकीत मदत केली आणि या सर्वाचा परिपाक म्हणून बाबर यांच्या गळयात विजयश्रीची माळ पडली.

आमदार बाबर हे या मतदारसंघामध्ये चारवेळा निवडून आले आहेत. सलग दोनवेळा निवडून येण्याचा मानही आमदार बाबर यांना मिळाला आहे. निकालानंतर आमदार बाबर यांच्यासह माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख , आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील, रविआण्णा देशमुख, माजी जि.प. उपाध्यक्ष सुहास शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, आटपाडीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्याची आतीषबाजी करत तरूण कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. आनंदात महिलावर्गही मोठया प्रमाणावर सहभागी झाला होता. आमदार बाबर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले. विटयाचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. या मिरवणूकीत तरूणांचा उत्साह अफाट होता शहरातील रस्त्यारस्त्यावर भगवे झेंडे फडकवले जात होते.

Intro:सांगली - प्रताप मेटकरी

अनिलभाऊंचा तब्बल 26 हजार 291 मतांनी विजयी
       आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या विजयाने खानापूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार बाबर यांनी विटा शहर वगळता मतदारसंघाच्या सर्वच भागात मताधिक्क्य घेत विजयावर शियकामोर्तब केले. आमदार अनिलभाऊ बाबर यांना 1 लाख 16 हजार 974 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना 90 हजार 683 इतकी मते मिळाले आमदार बाबर हे तब्बल 26 हजार 291 मतांनी विजयी झाले आहेत. आमदार बाबर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना सलग दुसर्‍यांदा विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत करत इतिहास घडवत करूया जागर पुन्हा बाबर असा नारा दिला आहे.
       Body:व्हिओ
आज गुरूवारी सकाळी 8 वाजता येथील शासकीय धान्य गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शंकर बर्गे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत नागेवाडी जिल्हा परिषद गटात आमदार बाबर यांनी मताधियय घेतले दुसर्‍या फेरीत देखिल आमदार बाबर हेच आघाडीवर होते. त्यानंतर माजी आमदार पाटील यांचे प्राबल्य असलेल्या विटा शहरात पाटील यांनी नाममात्र मताधियय घेतले. त्यानंतर चौथ्या फेरीपासून अठराव्या फेरीअखेर आमदार बाबर यांनी प्रत्येक फेरीत दिड ते दोन हजार मतांचे मताधिक्क्य घेत आघाडी कायम ठेवली. टपाली मतदानात देखिल आमदार बाबर यांना 574 मतांचे मताधियय मिळाले. आमदार बाबर यांना नागेवाडी जिल्हा परिषद गट, भाळवणी जिल्हा परिषद गट, तासगाव तालुययातील विसापूर सर्कल आणि लेगरे जिल्हा परिषद अशा सर्वच भागात मताधियय मिळाले तर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना विटा शहरात सुमारे 5 हजार 600 चे मताधिक्क्य मिळाले. तरी देखिल आमदार बाबर यांना आटपाडी तालुययाची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी 11 व्या फेरीअखेर सुमारे 8  हजार 582 मतांचे मताधियय मिळाले होते. आटपाडी तालुययात आमदार बाबर यांना सुमारे 17 हजार 709 इतके मताधिक्क्य मिळाल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे बाबर यांच्या विजयात आटपाडी तालुययाने मोठे योगदान दिल्याचे स्पष्ट होत आहे. 
        आमदार बाबर यांच्या विजयात सेना भाजपा युतीने एकसंघ राहून काम केले. त्यामध्ये खासदार संजयकाका पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावली होती खानापूर घाटमाथ्याचे नेते सुहास शिंदे यांनी सुरवातीलाच पाठींबा दिला होता. तर आटपाडी तालुययात भाजपा नेते माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व गोपीचंद पडळकर यांचीही युतीधर्म म्हणून आमदार बाबर यांना मोलाची साथ मिळाली. तर आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील यांनी प्रचाराची सर्व धुरा खांद्यावर घेतली होती. काँग्रेसचे युवा नेते जयदीप भोसले व राष्ट्रवादीचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनीही बाबर यांना पाठबळ देण्याची भुमिका घेतली. विसापुर सर्कल मध्ये खासदार संजयकाका पाटील गटासह स्व. आर.आर.पाटील यांना मानणार्‍या त्यांच्या समर्थकांनी आमदार बाबर यांना या निवडणूकीत मदत केली आणि या सर्वाचा परिपाक म्हणून बाबर यांच्या गळयात विजयश्रीची माळ पडली.
   आमदार बाबर हे या मतदारसंघामध्ये चारवेळा निवडून आले आहेत. सलग दोनवेळा निवडून येण्याचा मानही आमदार बाबर यांना मिळाला आहे. निकालानंतर आमदार बाबर यांच्यासह माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख , आटपाडीचे नेते तानाजीराव पाटील, रविआण्णा देशमुख, माजी जि.प. उपाध्यक्ष सुहास शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, आटपाडीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्याची आतीषबाजी करत तरूण कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. आनंदात महिलावर्गही मोठया प्रमाणावर सहभागी झाला होता. आमदार बाबर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले. विटयाचे ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले. या मिरवणूकीत तरूणांचा उत्साह अफाट होता शहरातील रस्त्यारस्त्यावर भगवे झेंडे फडकवले जात होते.
Conclusion:----
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.