ETV Bharat / state

Anil Babar Wife Passed Away: शिवसेना आमदार अनिल बाबर यांना पत्नीशोक; काही दिवसांपासून होत्या आजारी

author img

By

Published : Aug 3, 2022, 4:30 PM IST

विटा-खानापूर मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. ( Anil Babar Wife Passed Away ) शोभा अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन

सांगली - विटा-खानापूर मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. शोभा अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी - शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा अनिल बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 62 वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. बुधवारी सकाळी राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पती दोन मुलं, सून, नातवंड असा परिवार आहे. अनिल बाबर यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या पत्नी शोभा बाबर यांची साथ नेहमीच त्यांना साथ राहिली आहे. त्यांच्या निधनाने बाबर कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात - अनिल बाबर हे शिवसेनेचे आमदार म्हणून गेल्या दोन टर्म पासून विटा- खानापूर मतदारसंघातून निवडून येत आहेत. (2014)मध्ये पहिल्यांदा त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजयी झाले. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. सध्या ते शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील जेष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्री म्हणून वर्णी लागण्याचे दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - Ramdas Kadam: न्यायालय संख्याबळानुसार निकाल देते; रामदास कदम यांची न्यायालयातील सुनावणीवर प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.