सांगली - साखराळे हद्दीतील 1 हजार 500 एकर शेतामध्ये पुराचे पाणी शिरल्याने ऊस, सोयाबीन यासारख्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यावेळी साखराळे ग्रामपंचायतीकडे 500 शेतकऱ्यांनी अर्ज करूनही तलाठी किंवा कोणत्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे याचा निषेध करण्यासाठी शंखध्वनी आंदोलन केले.
इस्लामपूर शिवसेना शहर प्रमुख शकिल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पूराच्या पाण्याने झालेल्या पिकांचीं नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी महीला आघाडी जिल्हासघंटीका प्रतिभा शिदें, तालुकाप्रमुख युवराज निकम, सचिन सरनोबत, अॅड. अविनाश पाटील, सागर मलगुंडे उपस्थित होते.
यावेळी शकिल सय्यद म्हणाले, तहसीलदार यांनी जी 7 अधिकाऱयांची समिती नेमली आहे, या समितीने प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल कार्यालयात बसून अहवाल तयार केल्याचा आरोप सय्यद यांनी केला. यानंतर तहसीलदार रविद्रं सबनिस, समितीचे अध्यक्ष धनश्री भाबुंरे, मंडल निरीक्षक कैलास कोळेकर, कृषी अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदारांनी फेरसर्वे करुन लवकरच शेतकऱ्यांना न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिले.