ETV Bharat / state

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट; राजू शेट्टींना एकटं पाडण्याचा डाव?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

शेतकरी संघटनेत फूट
author img

By

Published : Apr 20, 2019, 11:18 AM IST

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आणि मतदानाला अवघे ४ दिवस शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी भाजप-शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे.

शेतकरी संघटनेत फूट

देशमुख हे सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे रहिवासी असून २००९ पासून ते स्वाभिमानीचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आंदोलनात राजू शेट्टींसोबत देशमुखांनी काम केले आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राजू शेट्टी जाऊन बसले आणि त्यांच्यासोबत महाघाडीत सामील झाले. म्हणून भाजप-शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हेही उपस्थित होते.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका केली तर पाशा पटेल यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता डोळे असून पण आंधळेपणाचे नाटक करणाऱ्या नेत्यांना मी पाहिले असल्याचे म्हटले.

Intro:अँकर- लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना आणि प्रत्यक्ष मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी भाजपा- शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. देशमुख हे सांगली जिल्ह्यतल्या शिराळा तालुक्यातील कोकरूड गावचे रहिवाशी असून २००९ साला पासून ते स्वाभिमानी चे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आंदोलनात राजू शेट्टी सोबत देशमुखांनी काम केलं आहे.Body:व्हीओ १ : शेतकरी संघटनेच्या आंदोलनात शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राजू शेट्टी जाऊन बसले आणि त्याच्या सोबत महाघाडीत सामील झाले म्हणून भाजपा- शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसच हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे ही उपस्थित होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दरम्यान विकास देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाला याचा फटका बसणार आहे. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर थेट टीका केली तर पाशा पटेल यांनी राजू शेट्टी यांचे नाव न घेता डोळे असून पण आंधळेपणाचे नाटक करणाऱ्या नेत्यांना मी पाहिल असल्याची खरमरीत टीका केली.

बाईट- पाशा पटेल (कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष)
बाईट- सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री
बाईट- विकास देशमुख (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष)

व्हीओ-2- विकास देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट पडली असून राजू शेट्टी यांना एकटं पाडण्याचा डाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.