ETV Bharat / state

MLA Shahaji Patil Video : डॉयलॉंगमुळे होतेय शहाजी पाटलांची दमछाक; मांडली व्यथा - Shahaji Patil

काय झाडी,काय डोंगार, काय हॉटेल, ( kay jhadi kay dongar ) एकदम ओके, या डॉयलॉगमुळे रातोरात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील ( Sangola MLA Shahaji Patil ) सेलिब्रिटी बनले आहेत. पण,आता त्यांच्या डॉयलॉगमुळे त्यांची पुरती दमछाक उडत असल्याचे खुद्द शहाजी पाटलांनी सांगितले आहे.

MLA Shahaji Patil
हाजी पाटील
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:30 PM IST

Updated : Jul 16, 2022, 6:39 PM IST

सांगली -"काय झाडी,काय हॉटेल"या ( kay jhadi kay dongar ) डायलॉंगमुळे सेलिब्रिटी झालेल्या आमदार शहाजी पाटील ( Sangola MLA Shahaji Patil ) यांना आता त्यांच्या डॉयलॉगमुळे पुरती दमछाक उडत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर मुंबई गाठू पर्यंत दमछाक होत असल्याचे शहाजी पाटील यांनी आपल्या खास शैलीतून कथन केले आहे. काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, एकदम ओके, या डॉयलॉगमुळे रातोरात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील सेलिब्रिटी बनले आहेत.

आमदार शहाजी पाटील

हेही वाचा - 60 वर्षाचा मजनू, 35 वर्षाची लैला.. पडले प्रेमात.. नको त्या अवस्थेत पाहताच गावकऱ्यांनी दिला बेदम चोप

पण, आता त्यांच्या डॉयलॉगमुळे त्यांची पुरती दमछाक उडत असल्याचे खुद्द शहाजी पाटलांनी ( MLA Shahaji Patil ) सांगितले आहे. पाटील म्हणाले, दिवसभर माझी काय अबदा उठते, त्या काय सांगू. घरापासून मुंबई पर्यंत चोरून मोरून बसायला लागतंय. कुठे चहा प्यायला, कुठे थांबायल मिळत नाहीत. जरा-जरी थांबलो की,तो बघा झाडावाला म्हणून दाणादाण माणसे आणि गाड्या आडव्या होतात. त्यामुळे फोटो,सेल्फीमुळे मी कंटाळुन गेलोय. पण काय सांगायचं, पुन्हा नाही म्हटलं की, गर्व झालाय,असं वाटलं. म्हणून आपण गप्प बसतोय..अशा शब्दात आमदार शहाजी पाटील ( MLA Shahaji Patil ) यांनी आपल्या खास शैलेतून रोज कशा पद्धतीने सामोरे जावे लागते याचे कथन केले आहे. ते वाळवा ( Walava ) येथे नागनाथअण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उठला होता.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांवर निशाणा - माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची तुफान फटकेबाजी वाळव्यामध्ये पाहायला मिळाली. सदाभाऊ खोत यांनी शहाजी पाटलांच्या विमान प्रवासावरून मिश्किल टोलेबाजी केली, मग शहाजी पाटलांनी विमान प्रवासाचा खुमासदार किस्सा ऐकवला. तर गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्यावर निशाणा साधत ते राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचं गौप्यस्फोट केलं आहे.

वाळवा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन - क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकोडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने वाळवा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, आणि या निमित्ताने बोलताना तिन्ही नेत्यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. सत्तांतरच्या दरम्यान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सुरत, गुवाहटी आणि गोवा विमान प्रवासावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची मिश्किल टोलेबाजी केली, त्याला शहाजी पाटलांनी देखील दाद देत, विमान प्रवासाचा किस्सा आपल्या गावरान शैलीतुन कथन केला आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले - शहाजी पाटलांचा प्रवास तसं मोठा आहे. तो सगळा विमानातुन हाय, पण बापू आता गाडीतून आलंय. त्यामुळे बापू सुरत, गुवाहाटी, गोवा, असा झाडी- झुडपे, दऱ्या- खोऱ्यातुन, जसा वाघ धाववा, तसा बापू गोव्याच्या समुद्राच्या किनाऱ्याला येऊन लागला. नुसता किनाऱ्यावर लागला नाही, तर महाराष्ट्रातील सरकार घालवून, वाळव्यात आले. एवढी महान व्यक्ती आपल्याला लाभली आहे. निश्चित बापू उद्याच्या मंत्रिमंडळात असाल, त्यानंतर तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन या, येताना दोरी घेऊन या, म्हणजे त्याला धरून मुंबईला येतो, असे मिश्किल भावना व्यक्त केली आहे. आमदार शहाजी पाटील यांनी सदाभाऊ खोतांच्या विमान प्रवासाचा मुद्द्यावर म्हणाले, सुरत, गुवाहाटी आणि गोव्याचा विमान प्रवासा आपण केला. मुंबईला पण विमानाने गेलो, पण त्यामुळे एका तडाख्यात तुमचे सरकार स्थापन केले आहे. पण विमानाचा प्रवास खतरनाक होता. कधी विमान ढगात हादरे बसले की, आमदार घाबरून जायचे, मी देखील घाबरलो होतो. एकवेळा तर थेट बाथरूमला जाण्याची वेळ आल्याचा किस्सा आपल्या खास शैलीतून सांगितला. यामुळे उपस्थितीतांच्या मध्ये एकचं हास्यकल्लोळ माजला होता.

माझ्यावर गुन्हा दाखल - भाजपा आमदार पडळकर म्हणाले, जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायची याची रचना केली होती. माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. पोलिसांनी सांगितले होते. याला यात अडकावा, माझ्या विरोधात हद्दपारीची नोटीस आहे. पण आम्ही घाबरलो नाही, रोज लढत राहिलो. पण 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला. त्यानंतर सेना आमदार सुरतला गेलेली बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा आजच्या तारखे पर्यंत त्यांचे सुतक गेले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जयंत पाटील सत्ता असेल, तर काम करू शकता. सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो. अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाली आहे, अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील ( Rebel MLA ShahajiBapu Patil ) यांनी विचारलेल्या एका वाक्याचे राज्यभरात विविध मिम्स आणि विनोद तयार झाले होते. शिंदे यांनी बापूना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली होती. तशाच टोनमध्ये शहाजीबापूंनी सर्वांसमोर ते वाक्य त्यांनी उच्चारले होते. महाराष्ट्रात सध्या प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर 'काय झाडी काय डोंगर काय हॉटेल' हे वाक्य व्हायरल होताना दिसत आहे. शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे.

हेही वाचा - Video : वृद्ध महिलेचा मृतदेह खाटेवर ठेवून कुटुंबाने केली १० किलोमीटर पायपीट.. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Last Updated : Jul 16, 2022, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.