सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात घरोघरी जाऊन नागरिकांकडून महापालिकेच्या आशा वर्कर या आरोग्य विषयक माहिती गोळा करणे व इतर कामे करत आहेत. आशा वर्कर महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी सांगलीतील राजेश नाईक फाऊंडेशन सरसावले आहे. रविवारी फाऊंडेशनच्या माध्यमातून महापालिकाकडे कार्यरत असणाऱ्या 99 आशा वर्कर कर्मचाऱ्यांना अँपरण, मास्क, हेड मास्क अशा सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंचे देण्यात आले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी राजेश नाईक फाऊंडेशनने आशा वर्कर महिलांच्या प्रती दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असून लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आर. एन. फाऊंडेशन पालिका व कर्मचाऱ्यांना अनेक पातळ्यांवर मदतीचा हात देत आहे आणि तो यापुढे राहावा, अशी अपेक्षा आयुक्त कापडणीस यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे,यावेळी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, आर. एन. फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप आपटे, नंदकुमार कारंडे, अशोक मुळीक आदी उपस्थित होते.