ETV Bharat / state

उल्लेखनीय उपक्रम..! लोकसहभागातून मुलींना मिळताहेत 'डिजिटल शिक्षणाचे' धडे - सुरक्षेची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे.

आरग येथे लोकसहभागातून जिल्हा परिषदेची मराठी मुलींची शाळा आज हायटेक बनली आहे. येथील मुलींना डिजिटल शिक्षणाचे धडे देण्याबरोबच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे.

डिजिटल पद्धतीचे शिक्षण घेतांना आरगा शाळेतील मुली
author img

By

Published : Jul 1, 2019, 5:58 PM IST

सांगली- एखाद्या कल्पनेला राजाश्रय बरोबरच लोकाश्रय मिळाल्यास काय होऊ शकते सांगलीच्या आरग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने दाखवून दिले आहे. आरग येथे लोकसहभागातून जिल्हा परिषदेची मराठी मुलींची शाळा आज हायटेक बनली आहे. येथील मुलींना डिजिटल शिक्षणाचे धडे देण्याबरोबच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था सुद्धा केली गेली आहे.

लोकसहभागातून मुलींना डिजिटल शिक्षणाचे धडे दिल्या जाणाऱ्या शाळेबद्दल माहिती देतांना ईटीव्ही भारत चे प्रतिनिधी

'बेटी बचाओ, बेटी पढाओचा' नारा शासनाकडून देण्यात येत आहे, त्यातून शासन स्तरावर मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक योजनाही अंमलात आणल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुलींना कितपत शिक्षण मिळते, हा प्रश्न आहे ? पण शासनाच्या योजनेला जर जनतेची साथ मिळाली, तर त्याचा कायापालट होऊ शकतो हे सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेने दाखवून दिले आहे. लोकसहभागातून ही शाळा "हायटेक" बनविण्यात आली आहे. लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेचे आज रुपडे पालटले आहे. ज्ञानाबरोबरच डिजिटल शिक्षणाचे धडे या शाळेत दिले जात आहे. त्यासोबतच मुलींची सुरक्षा व आरोग्याची सुविधा सुद्धा या शाळेत उपलब्ध करण्यात आली आहे.

शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक वर्गात एलसीडी टीव्ही, फॅन, कम्प्युटर, पिण्यासाठी आर.ओ वॉटर, अद्यावत प्रयोग शाळा अशा अनेक सुविधा मुलींसाठी उपलब्ध आहेत. एखाद्या इंग्रजी शाळेत असणाऱ्या सुविधा प्रमाणे या अद्यावत शिक्षण प्रणालीला शोभेल अश्या सुविधा या जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकसहभागातून निर्माण झाल्या आहेत.

शाळेच्या प्रांगणात मुलींना नेहमी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर प्रार्थनेसाठी किंवा इतर कारणांसाठी अडचण येत होती. ती लक्षात घेता याठिकाणी गावातीलच एका अमेरिकेतील स्थायिक ग्रामस्थाने सभामंडप उभारून शाळेच्या विकासाला हातभार लावला आहे.

सध्या बारा शिक्षकांचा समूह या शाळेत शिक्षणाचे धडे देत आहे. रविवारीसुद्धा ही शाळा भरते आणि खाजगी शाळांप्रमाणे या ठिकाणी अधिक तास घेतले जाते. याचाच परिणाम गेल्या पाच वर्षात या शाळेतील ३७ मुली शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. तर या शाळेचे यश आणि या ठिकाणी मुलींसाठी असणाऱ्या अद्यावत भौतिक सुविधा, यामुळे शाळेची पटसंख्येत वाढ झाली आहे. आज जवळपास ३३२ मुली या शाळेत शिक्षण घेत असून, एवढी मोठी पटसंख्या असणारी जिल्हयातील जिल्हा परिषदेची ही एकमेव शाळा ठरली आहे. त्यामुळे, जिल्ह्यात एक आदर्श मराठी मुलींची शाळा म्हणून या शाळेचे नाव प्रसिद्ध झाले आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

स्पेशल - PKG

FEED SEND - FILE NAME -

MH_SNG_ZP_SHALA_01_JULLY_2019_VIS_1_REDY_TO_USE_7203751

स्लग - लोकसहभागातून बनली जिल्हा परिषदेची शाळा 'हायटेक',सुरक्षे पासून डिजिटल शिक्षणाचे मुलींना मिळतायत धडे..

अँकर - एखाद्या कल्पनेला राजाश्रय बरोबरच लोकाश्रय मिळाल्यास काय होतं, ते सांगलीच्या आरग येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने दाखवून दिले आहे. लोकसहभागातून जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आज हायटेक बनली आहे. मुलींच्या सुरक्षेपासून डिजिटल शिक्षणाचे धडे शाळेत उपलब्ध झाले आहेत...
पाहुयात लोकसहभागातून कायापालट झालेल्या जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेचा स्पेशल रिपोर्ट ..

Body:व्ही वो - बेटी बचाव,बेटी पढावचा नारा शासनाकडून देण्यात येत आहे,त्यातून शासन स्तरावर मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक योजनाही अंमलात आणले आहेत.मात्र प्रत्यक्षात मुलींना कितपत शिक्षण मिळतं,हा प्रश्नच आहे ? पण शासनाच्या योजनेला जर जनतेची साथ मिळाली,तर त्याचा कायापालट होऊ शकतो हे वास्तव आहे.आणि अश्याच एका लोकसहभागातून सांगलीच्या मिरज तालुक्यातील आरग येथील जिल्हा परिषदेची मुलींची शाळा "हायटेक" बनली आहे.लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेचे आज रुपडे पालटले आहे. ज्ञानाबरोबर डिजिटल शिक्षणाचे धडे त्याच बरोबर मुलींच्या सुरक्षेबरोबर आरोग्याचे सुविधा या शाळेत उपलब्ध झाल्या आहेत.
ग्रामस्थ आणि शिक्षक यांच्या प्रयत्नातून शाळेत आज या आधुनिक भौतिक सुविधा उपलब्ध झाले आहेत.शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे,प्रत्येक वर्गात एलसीडी टीव्ही,प्रत्यके वर्गात फॅन,काम्प्युटर, पिण्यासाठी आरओ वॉटर,अद्यावत प्रयोग शाळा अश्या अनेक सुविधा मुलींच्यासाठी उपलब्ध आहेत.एखाद्या इंग्रजी शाळेत असणाऱ्या सुविधा प्रमाणे या अद्यावत शिक्षण प्रणालीला शोभेल अश्या सुविधा आज या जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकसहभागातून निर्माण झाल्या आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात एक आदर्श मराठी मुलींची शाळा म्हणून नावलौकिक मिळवत आहे.

बाईट -

व्ही वो - शाळेत दाखल होण्यापासून शाळेच्या बाहेर जाऊस पर्यंत मुलींच्यावर सुरक्षेच्यादृष्टीने नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा,शिक्षक व पालक यांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.तर प्रत्येक वर्गात पुस्तके धरण बरोबर आज काळाची गरज बनलेली डिजिटल शिक्षण टीव्हीच्या माध्यमातून मुलींना देण्यात येत आहे.आणि यामुळे मुलींच्या मध्ये शिक्षणाची अधिक गोडी निर्माण होत आहे. त्याचबरोबर या मुलींना इंटरनेटचं अद्यावत ज्ञान मिळावे यासाठी कॉम्प्युटरचेही शिक्षण देण्यात येते.इतकच नव्हे,तर या शाळेत मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक वर्गात फॅन,त्याचबरोबर पिण्यासाठी आरओ युनिट बसवण्यात आले आहे.तर शाळेच्या प्रांगणात मुलींना नेहमी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर प्रार्थना साठी किंवा इतर कारणांसाठी येणारी अडचण लक्षात घेत याठिकाणी गावातील एका अमेरिका स्थायिक ग्रामस्थाने सभामंडप उभारून दिले आहे.आणि हे सर्व शक्य झाले आहे,ते केवळ लोकसहभागातून ..

बाईट -

व्ही वो - बारा शिक्षकांचा समूह या शाळेत मनापासून शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धडपड करतोय,इतकेच नव्हे तर रविवारीसुद्धा ही शाळा भरते आणि खाजगी शाळां प्रमाणे या ठिकाणी अधिक तास घेऊन,आजच्या स्पर्धेच्या युगात मुलींना गुणवत्तपूर्ण बनवण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.याचाच परिणाम गेल्या पाच वर्षात या शाळेतील 37 मुली शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत.तर या शाळेचे यश आणि याठिकाणी मुलींच्यासाठी असणाऱ्या अद्यावत भौतिक सुविधा यामुळे शाळेची पटसंख्येत वाढ झाली आहे.आज जवळपास ३३२ मुली शिक्षण घेत असून एवढा मोठी पटसंख्या असणारी जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या ही एकमेव शाळा ठरली आहे.

बाईट -

Conclusion:व्ही वो - जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबत असणाऱ्या समाजाची ओरड,सांगलीच्या आरग मधील या जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेने समाजाच्याच पुढाकारातुन थांबवली आहे.शिवाय इतर जिल्हा परिषदेच्या शाळांना शिक्षणाचा नवा पॅटर्न लोकसहभागातून निर्माण करण्याचा अद्यावत मार्ग दाखवून दिला आहे.त्यामुळे या शाळेचा आदर्श इतर शाळांना आणि ग्रामस्थांना प्रेरणा देणारा नक्कीच आहे...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.