सांगली : पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या शपथविधी सोहळ्याप्रमाणेच (Swearing Ceremony) चक्क सरपंच पदाचा शपथविधी सोहळा देखील मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वंजारवाडीमध्ये हा अनोखा शपथविधी सोहळा (Sarpanch swearing ceremony at Vanjarwadi) पार पडला आहे. सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी अगदी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांप्रमाणे ऐटीत शपथ घेतली आणि यासाठी या शपथविधीसाठी संपूर्ण गाव, शासकीय अधिकारी आणि स्थानिक नेते आवर्जून उपस्थित होते.
दिमाखदार शपथविधी सोहळा : पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि आमदार पदाचा शपथविधी पार पडतो मग सरपंच पदाचा का नाही? या धारणेतून सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे थेट सरपंच पदाचा दिमाखदार शपथविधी सोहळा ( Sarpanch swearing ceremony at Vanjarwadi in Sangli) पार पडला आहे. यासाठी वंजारवाडी ग्रामपंचायतीला सजवण्यात देखील आले होते. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये सकाळपासून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंचांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती आणि धुमधडाक्यामध्ये आतिशबाजी करत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदभार आणि शपथ ग्रहण सोहळा पार पडला आहे. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी, नुतून ग्रामपंचायत सदस्य गावकरी आणि स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नवनियुक्त सरपंच अरुण खरमाटे यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे.
लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड : नुकतेच पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे अरुण खरमाटे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहेत आणि आपल्या सरपंच पदाचा कारभार स्वीकारण्याआधी अगदी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा ज्या पद्धतीने शपथविधी होतो त्याच धर्तीवर सरपंच पदाचा शपथविधी घेऊन कारभार सुरू करण्याच्या निर्धार करण्यात आला होता. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात शानदार छोटे खाणी सोहळ्यात अरुण खरमाटे यांनी सरपंच पदाची शपथ घेतली. तसेच नुतून ग्रामपंचायत सदस्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. अगदी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना प्रमाणे थाटात हा पदभार घेण्यात आला. त्यानंतर सरपंच खरमाटे आणि नुतून ग्रामपंचायत यांनी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल होऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
अनोख्या पद्धतीने सोहळ्याचे आयोजन : गाव गाडयाचा कारभार पाहणाऱ्या सरपंचाच्या अधिकारात विशेष वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. विशेष म्हणजे लोकनियुक्त सरपंचयामुळे सरपंच पदाला महत्त्व देखील आले आहे आणि गाव गाड्यांचा कारभार पाहणाऱ्या सरपंच पदाला मान-सन्मान मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा शपथविधी जसा होतो, त्याच पद्धतीने सरपंच पदाचा देखील शपथविधी व्हावा, या धारणेतून वंजारवाडी गावकऱ्यांनी हा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला होता.