सांगली - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन ( Shivaji statue desecration Case ) कर्नाटकातील बंगळुरु येथे करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या शिवसैनिकांनी ( Sangli Shivsena Agitation ) थेट कर्नाटकच्या सीमेवर ( Karnataka State Border ) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka Chief Minister Basavaraj Bommai ) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यासह कन्नड रक्षिका वेदिका संघटनेच्या ध्वजाचे दहन केले. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसैनिक धडकले कर्नाटक सीमेवर...
कर्नाटकच्या बंगळुरु याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विटंबनेचा प्रकार घडला. त्यानंतर महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटत आहेत. सांगली शिवसेनेच्या वतीने ही कर्नाटक सरकारच्या विरोधात दररोज आंदोलन करण्यात येत आहेत. संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जाऊन धडक दिली. यावेळी संतप्त शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्र हद्दीतील म्हैसाळ येथे कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या पुतळ्याचे तसेच कन्नड रक्षिका वेदिका संघटनेच्या ध्वजाचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटपटीचा प्रकार घडला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. कर्नाटकमध्ये यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनाच्या प्रकार घडला तर कर्नाटकात जाऊन कर्नाटक सरकारला धडा शिकवू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
दोन्ही बाजुची वाहतूक सेवा बंद !
शिवसेनेच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हद्दीत कर्नाटक पोलिसांचा त्याचबरोबर महाराष्ट्र हद्दीत महाराष्ट्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ दोन्ही राज्यातील वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती.
हे ही वाचा - Khanapur Nagar Panchayat Election : 102 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क