सांगली - सांगलीतील शिवसेनेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ इस्लामपूरमध्ये शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढत पाठिंबा जाहीर केले आहे. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन आंनद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात हा बंड असल्याचे स्पष्ट केले आहे. ( Sangli Shiv Sena Workers rallied in support of Eknath Shinde )
वाळवा आणि शिराळ्याची शिवसेना शिंदे सोबत - सांगली जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख असणारे आनंद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शहरातून रॅली काढत व पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं जाहीर केले आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. अडीच वर्षांमध्ये जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रचंड त्रास शिवसैनिकांना झाल्याचा आरोप आनंद पवार यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आपला बंड असल्याचे सांगत आपण शिवसेनेसोबतच असल्याचा स्पष्ट केले आहे.
जयंत पाटलांच्यावर गंभीर आरोप - यावेळी बोलताना आंनद पवार म्हणाले, इस्लामपूरमध्ये पालकमंत्री जयंत पाटील हे नेहमीच दुजाभाव करत राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेची गळचेपी करत आहेत, वारंवार आम्ही पक्ष्याला सांगितले आहे. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याउलट सेनेच्या अनेक नेत्यांना मर्डरमध्ये देखील अडकवले आहे. निधी देखील शिवसेनेला दिला जात नाही, अशी अनेक आरोप आनंद पवार यांनी केले आहेत. पण आम्ही सेना सोडणार नाही, मात्र जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून आमचा बंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या अन्यायाविरोधात असल्याचे, ग्रामीण जिल्हाप्रमुख आंनद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Narhari Zirwal Not Reachable :...अन् आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ झाले नॉट रिचेबल