ETV Bharat / state

शिराळ्यात सत्यजित देशमुखांची घरवापसी? - सत्यजित देशमुख न्यूज

सत्यजित देशमुख यांच्या घरवापसीला घेऊन मतदारसंघात चर्चेचे रान उठले आहे. शिराळा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप पक्षात प्रवेश केला. देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश होताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी पुढील वाटाघाटीच्या संदर्भात चर्चा होऊनच त्यांनी प्रवेश केला होता.

सत्यजित देशमुख
author img

By

Published : Nov 21, 2019, 6:22 PM IST

सांगली - जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून परिचित असलेले दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे आता भाजपमधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आहेत. मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही या बातमीची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात मटणाचे दर कडाडले, खवय्ये नाराज

एकंदरीत सत्यजित देशमुख यांच्या घरवापसीला घेऊन मतदारसंघात चर्चेचे रान उठले आहे. शिराळा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप पक्षात प्रवेश केला. देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश होताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी पुढील वाटाघाटीच्या संदर्भात चर्चा होऊनच त्यांनी प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वी मतदारसंघात ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाचे वादळ फार मोठे होते. भाजप प्रवेश निश्चित झाला त्यावेळेला त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते. तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषद देऊन सत्यजित देशमुख यांना भाजपकडून विधानसभेचे तिकीट देण्याचे ठरले असल्याचे सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते.

त्या धर्तीवरती दोघांनाही भाजपकडून तसेच भाजप पक्षश्रेष्ठींकडून विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले गेले. दोघांनीही हे अर्ज दाखल केले व पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य करण्याचे सांगितले होते. अर्ज माघारीच्या दिवशी भाजप पक्षश्रेष्ठींकडून तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला. सहाजिकच शिवाजीराव नाईक यांच्यावरती भाजपकडून तिकीटासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला व सत्यजित देशमुख यांना माघार घेण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य करायचा त्याप्रमाणे सत्यजित देशमुख यांनी त्यांचा अर्ज माघारी काढून घेतला.

हेही वाचा - ऊस आंदोलनाला हिंसक वळण, एक ट्रॅक्टर पेटवला

विधानसभेच्या रिंगणात भाजपकडून शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीकडून मानसिंगराव नाईक तर अपक्ष म्हणून सम्राट महाडिक यांच्यात प्रमुख लढत होती. सत्यजित देशमुख यांनी पायाला भिंगरी बांधून शिराळा विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव नाईक यांचा प्रचार केला. शिवाजीराव नाईक यांचा गट व सत्यजित देशमुख यांचा गट मिळून निश्चित विजय मिळण्याची खात्री त्यांना होती. या खात्रीवरती शिवाजीराव नाईक हे पुन्हा आमदार होणार असे ठामपणे दोघांच्याही कार्यकर्त्यांकडून सांगितले जात होते.

शिवाजीराव नाईक हे निवडून आल्यानंतर त्यांना विधानसभा व सत्यजित देशमुख यांना विधानपरिषद असे एकंदरीत गणित भाजप पक्षश्रेष्ठींकडून दोघांनाही सांगण्यात आले होते. त्यामुळे दोघांचे कार्यकर्ते एकसंघपणे शिवाजीराव नाईक यांच्या विजयासाठी कार्यरत राहिले. दरम्यानच्या काळात शिराळा विधानसभा मतदारसंघातील ४८ गावातून सम्राट महाडिक यांची प्रथमच ४८ गावातील उमेदवार म्हणून उमेदवारी राहिली होती. त्यामुळे त्यांनाही या ४८ गावातून भरघोस मते मिळतील अशी अपेक्षा होती. तशी त्यांनी ती अपेक्षा गृहीत धरूनच निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी गत पराभवापासूनच २०१९ च्या विधानसभेची तयारी सुरू केली होती. २०१९ च्या विधानसभेचे मैदान मीच मारणार असा ठाम विश्वास त्यांनी व्यासपीठावरतीही करून दाखवला होता.

शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख आणि शिवाजीराव नाईक यांनी गृहीत धरून केलेल्या नियोजनाला अपयश आले. तब्बल 25 हजाराच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक निवडून आले. मानसिंगराव नाईक यांच्या विजयाने शिवाजीराव नाईक व सत्यजीत देशमुख या दोघांच्याही गोटात पुन्हा संभ्रमाची अवस्था निर्माण झाली. शिवाजीराव नाईक हे आमदार झाले तरच सत्यजित देशमुख यांना विधानपरिषद दिली जाईल, असे एकंदरीत संकेत होते. परंतु, आता शिवाजीराव नाईक हेच पराभूत झाल्याने सत्यजित देशमुख यांचा कोणताच ठावठिकाणा भाजपमध्ये लागणार नसल्याच्या पुन्हा चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या. किंबहुना शिवाजीराव नाईक यांच्या पराभवामुळे आता सत्यजित देशमुख यांची कोंडी होणार असे खुद्द सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जाऊ लागले.

आता तर राज्यात भाजपचे सरकारही स्थापन होणार नसल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिघे मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या धरतीवरती शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत. भाजपचे सरकार नसल्याने सत्यजित देशमुख यांना कुठेच संधी मिळणार नाही असेही बोलले जात आहे. काँग्रेस सत्तेत आली तर पुन्हा सत्यजित देशमुख यांचा सहानुभूतीने विचार करतील, अशा एकंदरीत चर्चा सध्या मतदारसंघात आहेत.

निर्णयावरती ठाम -

भाजपमध्ये अलीकडेच मी पक्ष प्रवेश केला असून भाजपमध्येच मी राहणार आहे. कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार उभा केला जाणार आहे, तो भाजपच्या चिन्हावरतीच उभा केला जाणार आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षात पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या फक्त चर्चाच आहेत. मी घेतलेल्या निर्णयावरती ठाम असल्याचे सत्यजित देशमुख यांनी सांगितले.

Intro:Body:.Conclusion:अँकर,, शिराळ्यात सत्यजित देशमुखांची घरवापसी..!
काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केलेले सत्यजित देशमुख पुन्हा काँगेस मध्ये दाखल होणार असल्याचे कार्यकर्त्यांच्या कडून दुजोरा : शिराळा मतदार संघात चर्चा.
स्लग,, सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून परिचित असलेले स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे आता भाजप पक्षातून काँग्रेस पक्षात घर वापसी करणार आहेत. मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कडूनही याला दुजोरा मिळत आहे.
विवो,, एकंदरीत सत्यजित देशमुख यांच्या घरवापसीला घेऊन मतदारसंघात चर्चेचे रान उठले आहे.
शिराळा विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजप पक्षात प्रवेश केला. देशमुख यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश होताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी पुढील वाटाघाटीच्या संदर्भात चर्चा होऊनच त्यांनी प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वी मतदार संघात ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार असल्याच्या चर्चाचे वादळ फार मोठे होते. भाजप प्रवेश निश्चित झाला त्यावेळेला त्यांना विधानसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कडून सांगितले जात होते. तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांना विधानपरिषद देऊन सत्यजित देशमुख यांना भाजपातून विधानसभेचे तिकीट देण्याचे ठरले असल्याचे सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांच्या कडून सांगितले जात होते.
त्या धर्तीवरती दोघांनाही भाजप पक्षाकडून तसेच भाजपा पक्षश्रेष्ठींच्या कडून विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले गेले. दोघांनीही हे अर्ज दाखल केले व पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य करण्याचे सांगितले होते. अर्ज माघारीच्या दिवशी भाजपा पक्षश्रेष्ठींच्या कडून तात्कालीन आमदार शिवाजीराव नाईक यांना भाजपा पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला. सहाजिकच शिवाजीराव नाईक यांच्या वरती भाजप पक्षाकडून तिकीटासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला व सत्यजित देशमुख यांना माघार घेण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा आदेश मान्य करायचा त्याप्रमाणे सत्यजित देशमुख यांनी त्यांचा अर्ज माघारी काढून घेतला.
विधानसभेच्या रिंगणात भाजपाकडून शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीकडून मानसिंगराव नाईक तर अपक्ष म्हणून सम्राट महाडिक यांच्याकडून प्रमुख लढत म्हणून प्रचाराची मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. या तिघांच्या मध्येच लढत होणार हेही निश्चित होते. सत्यजित देशमुख यांनी पायाला भिंगरी बांधून शिराळा विधानसभा मतदार संघात शिवाजीराव नाईक यांचा प्रचार केला. शिवाजीराव नाईक यांचा गट व सत्यजित देशमुख यांचा गट मिळून निश्चित विजय मिळण्याची खात्री होती. या खात्री वरती शिवाजीराव नाईक हे पुन्हा आमदार होणार असे ठामपणे दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या कडून सांगितले जात होते.
शिवाजीराव नाईक हे निवडून आल्यानंतर त्यांना विधानसभा व सत्यजित देशमुख यांना विधान परिषद असे एकंदरीत गणित भाजपा पक्षश्रेष्ठींच्या कडून दोघांच्याही कार्यकर्त्यांना आणि दोघांनाही सांगण्यात आले होते. त्यामुळे दोघांची कार्यकर्ते एकसंघपणे शिवाजीराव नाईक यांच्या विजयासाठी कार्यरत राहिले. दरम्यानच्या काळात शिराळा विधानसभा मतदार संघातील ४८ गावातून सम्राट महाडिक यांची प्रथमच ४८ गावातील उमेदवार म्हणून उमेदवारी राहिली होती. त्यामुळे त्यांनाही या ४८ गावातून भरघोस मते मिळतील अशी अपेक्षा होती. तशी त्यांनी ती अपेक्षा गृहीत धरूनच निवडणूक लढवली. राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांनी गत पराभवा पासूनच २०१९ च्या विधानसभेची तयारी सुरू केली होती. २०१९ च्या विधानसभेचे मैदान मीच मारणार असा ठाम विश्वास त्यांनी खुल्या व्यासपीठावरतीही करून दाखवला होता.
शिराळा विधानसभा मतदार संघात सत्यजित देशमुख आणि शिवाजीराव नाईक यांनी गृहीत धरून केलेल्या नियोजनाला अपयश आले. तब्बल पंचवीस हजाराच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक निवडून आले. मानसिंगराव नाईक यांच्या विजयाने शिवाजीराव नाईक व सत्यजीत देशमुख या दोघांच्याही गोटात पुन्हा संभ्रमाची अवस्था निर्माण झाली. शिवाजीराव नाईक हे आमदार झाले तरच सत्यजित देशमुख यांना विधान परिषद दिली जाईल असे एकंदरीत संकेत होते. परंतु आता शिवाजीराव नाईक हेच पराभूत झाल्याने सत्यजित देशमुख यांचा कोणताच ठावठिकाणा भाजपात लागणार नसल्याच्या पुन्हा चर्चा मतदारसंघात रंगू लागल्या. किंबहुना शिवाजीराव नाईक यांच्या पराजयामुळे आता सत्यजित देशमुख यांची कोंडी होणार असे खुद्द सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांच्या कडून बोलले जाऊ लागले.
आता तर राज्यात भाजपाचे सरकारही स्थापन होणार नसल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिघे मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत. या धरतीवरती शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी करणार असल्याचे ऐकिवात येऊ लागले आहे. भाजपाचे सरकार नसल्याने सत्यजित देशमुख यांना कुठेच संधी मिळणार नाही असेही बोलले जात आहे. काँग्रेस सत्तेत आली तर पुन्हा सत्यजित देशमुख यांचा सहानुभूतीने विचार करतील अशा एकंदरीत चर्चा सध्या मतदारसंघात आहेत.

निर्णयावरती ठाम...
भाजपा पक्षांमध्ये अलीकडेच मी पक्ष प्रवेश केला असून भाजप पक्षातच मी राहणार आहे. कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवार उभा केला जाणार आहे तो भाजपाच्या चिन्हावरतीच उभा केला जाणार आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षात पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या फक्त चर्चाच आहेत. मी घेतलेल्या निर्णयावरती ठाम आहे.
सत्यजित देशमुख
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.