सांगली - शिराळ्याच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सलग सातव्या दिवशी अतिवृष्टी कायम ( rain started in chandoli dam area ) आहे. गेल्या 24 तासांत 67 मिलिमीटर इतक्या पाऊसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण 72 टक्के भरले ( chandoli dam 72 percentage ) आहे. जिल्ह्यातला पाऊसाचा जोर आता ओसरला आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी स्थिर आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये आता पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 6 मिलीमीटर आणि शिराळा तालुक्यातील 15 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. पाऊसाचा जोर मंदावल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांचे वाढणारी पाण्याची पातळी आता स्थिर झाली आहे. मात्र, अद्यापही पात्र बाहेर आहे. तर, कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी अत्यंत संथ गतीने घटत आहे. सध्या सांगलीमधील आयर्विन पूल या ठिकाणी 19 फूट इतके पाण्याची पातळी झालेली आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा काठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
तर, दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात धुंवाधार असा पाऊस पडत आहे. गेल्या सात दिवसांपासून या ठिकाणी अतिवृष्टी सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 67 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. 34.40 टीएमसी इतका पाणीसाठा असणाऱ्या चांदोली धरणामध्ये आता 27.52 टीएमसी इतका पाणी साठा निर्माण झाला आहे. त्यामुळे चांदोली धरण हे 72 टक्के भरले आहे. धरणातून 1800 क्युसेकस पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रामध्ये करण्यात येत आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही'; संजय राऊतांनी दिपाली सय्यदांना खडसावलं