ETV Bharat / state

बनावट वॉटर फिल्टर कारखान्याचा पोलिसांकडून पर्दाफाश ; 48 लाखांचा मुद्देमाल जप्त - Sangli latest crime news

संशयित सुनील अथनीकर हे हलक्या दर्जाचे पाणी शुद्ध करण्याचे मशीन (वॉटर फिल्टर) बनवत होते. त्यावर युरेका फोब्स लिमिटेड (मुबंई) या फिल्टर कंपनीचे (MLT) कँडल नावचे लेबल चिकटवून विक्री करत होते.

छापा टाकताना कुपवाडा पोलीस
छापा टाकताना कुपवाडा पोलीस
author img

By

Published : Nov 26, 2020, 4:53 PM IST

Updated : Nov 26, 2020, 5:16 PM IST

सांगली - तुम्ही वॉटर फिल्टर करताना काळजी घ्या. कारण, ब्रँँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट वॉटर फिल्टर तयार करणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारखान्यावर कुपवाड पोलिसांनी छापा टाकत 48 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कुपवाड एमआयडीसीमधील कारखान्याचा मालक सुनील अथनीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युरेका फोब्स या फिल्टर कंपनीचे लेबल लावून कमी दर्जाचे मशीन कुपवाड एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात तयार करण्यात येत होते. या बनावट वॉटर फिल्टरचा कुपवाड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

बनावट वॉटर फिल्टर कारखान्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

हेही वाचा-'26/11' मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण; हल्ला झालेल्या ठिकाणची जाणून घ्या स्थिती

बनावट लेबल लावून वॉटर फिल्टरची विक्री-

संशयित सुनील अथनीकर हे हलक्या दर्जाचे पाणी शुद्ध करण्याचे मशीन (वॉटर फिल्टर) बनवत होते. त्यावर युरेका फोब्स लिमिटेड (मुबंई) या फिल्टर कंपनीचे (MLT) कँडल नावचे लेबल चिकटवून विक्री करत होते. याबाबत सह्याद्री कॉपी राईट प्रोडक्शन फार्मचे आशुतोष पाटील यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अथणीकर यांच्या बालाजी एन्टररप्राइजेस नावाच्या कारखान्यात छापा टाकला.

48 लाख 92 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त-

मल्टी लेअर कँडलचे 103 बॉक्स आढळून आले आहेत. त्यामधील सुमारे 48 लाख 92 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बनावट मालावर कंपनीचे लेबल लावून विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी संशयित अथणीकर यावर कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हेही वाचा-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज; 'अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन'

Last Updated : Nov 26, 2020, 5:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.