ETV Bharat / state

संचारबंदीत आणखी एक संकट, ३० दिवसात बांधकाम पाडा, पुरपट्ट्यातील अतिक्रमण धारकांना पालिकेची नोटीस

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून यातील अनेक मालमत्ताधारकांना बांधकाम पाडावेत, घरे खाली करावेत अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बफरझोन असताना अतिक्रमण करून घरे बांधण्यात आल्याने पालिकेने या नोटीस बाजवल्या आहेत.

संचारबंदीत आणखी एक संकट
संचारबंदीत आणखी एक संकट
author img

By

Published : Apr 27, 2020, 3:17 PM IST

सांगली - येथील महापालिका क्षेत्रातल्या पुरपट्ट्यातील बफर झोनमधील अतिक्रमण धारकांना महापालिका प्रशासनाने बांधकामे पाडावे, घरे खाली करावेत अशा नोटीस बजावल्या आहेत. ३० दिवसात याची अंमलबजावणी करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात पालिकेच्या या कारवाईमुळे पुरपट्ट्यातील नागरिक हादरून गेले आहेत.

महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाने सांगली शहराच्या कृष्णाकाठच्या पुरपट्ट्यातील व नाल्यावरील भाग बफरझोन म्हणून जाहीर केला होता. ज्यामध्ये उपनगरातील दत्तनगर, काकानगर यासह आसपासच्या परिसराचा समावेश आहे. या बफरझोनमध्ये सुमारे ३०० हुन अधिक घरे आहेत. महापालिका प्रशासनाकडून यातील अनेक मालमत्ता धारकांना बांधकाम पाडावेत, घरे खाली करावेत अशा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. बफरझोन असताना अतिक्रमण करून घरे बांधण्यात आल्याने पालिकेने या नोटीस बाजवल्या आहेत. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ही पाऊले उचलली आहेत. तसेच येत्या ३० दिवसात नागरिकांनी याची अंमलबजावणी करावी, अन्यथा पालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा, इशाराही देण्यात आल्या आहेत. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत.

गेल्या २५ ते ३० वर्षांपासून या गुंठेवारी भागात शेकडो नागरिक राहत आहेत. येथील सर्वजण गोरगरीब आहेत. संचारबंदीमुळे आधीच कामधंदा नसल्याने आम्ही अडचणीत आहोत त्यामुळे, पालिका प्रशासनाने दिलेल्या नोटीसांचा विचार करावा अशी मागणी या नागरिकांकडून करण्यात आली आहे. तर, संचारबंदी असताना पालिकेकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.