ETV Bharat / state

सांगली मतदारसंघ : महाआघाडी उमेदवारीच्या घोळात, तर भाजप असंतुष्टांच्या नाकदुऱ्या काढण्यात व्यस्त

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्एचपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यमान खासदार संजय पाटील भाजपाकडून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस की स्वाभिमानी शेतकरी संघटना हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

महाआघाडी युतीत थेट लढत
author img

By

Published : Mar 27, 2019, 10:08 AM IST

सांगली - सांगली लोकसभा निवडणूक सद्य स्थितीला काँग्रेससह भाजपला डोकेदुखी बनली आहे. काँग्रेस की स्वाभिमानी या घोळात महाआघाडी अडकली आहे. तर भाजपातील गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी आणि अजित घोरपडे यांची निवडणुकीची तयारी, हे भाजपसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजप नेते या नाराज नेत्यांची समजूत काढण्यात अडकली आहेत.

महाआघाडी युतीत थेट लढत

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २८ मार्एचपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. विद्यमान खासदार संजय पाटील भाजपाकडून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेस की स्वाभिमानी शेतकरी संघटना हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे संजय पाटील यांच्या विरोधात तगडा विरोधक कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसमधून विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला. मात्र सांगलीची जागा नेमकी कोणाच्या वाटेला जाते यावर त्यांची भूमिका ठरेल, असे मानले जात आहे.

सांगलीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता !
संध्याकाळपर्यंत महाआघाडीतील सांगलीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना माघार घेत काँग्रेसला किंबहुना वसंतदादा घराण्याला ही जागा देण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत प्रतीक पाटील यांनी विशाल पाटील यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन, आपण वसंतदादा घराण्याच्या विरोधात नसून सांगलीची जागा काँग्रेसला मिळेल आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे सांगलीची जागा काँग्रेसला आणि उमेदवारी विशाल पाटील यांना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपा समोर नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान..
भाजपचे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. संजय पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून पडळकर यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे. संजय पाटलांना थेट आव्हान देत गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजपाचे नाराज नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे हे सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. येत्या २ दिवसात ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन लोकसभेचा निर्णय जाहीर करणार आहेत. भाजपातील दोन्ही नेत्यांच्या उमेदवारी निर्णयामुळे संजय पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून गोपीचंद पडळकर यांची बंडखोरी आणि अजित घोरपडे यांची निवडणुकीची तयारी थांबवणे, हे संजय पाटील आणि भाजपसमोर आव्हान असणार आहे.

गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा होऊन, पडळकर यांची मुख्यमंत्री समजूत काढतील. यानंतर पडळकर यांच्या उमेदवारीवर पडदा पडेल, अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

वंचित बहुजन विकास आघाडी मैदानात..
सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी ही मैदानात उतरली आहे. या ठिकाणी कवठेमहांकाळ तालुक्याचे धनगर समाजच नेते जयसिंगतात्या शेंडगे हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटनाही मैदानात उतरली असून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने निवडणूक लढवणार आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

FEED SEND - FILE NAME - R_MH_1_SNG_26_MARCH_2019_CONGRESS_BJP_TIDHA_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_5_SNG_26_MARCH_2019_CONGRESS_BJP_TIDHA_SARFARAJ_SANADI

स्लग - महाआघाडी अडकली जागा आणि उमेदवारीच्या घोळात,तर भाजपा नाराज नेत्यांच्या समजूत काढण्यात..

अँकर - सांगली लोकसभा निवडणूक सद्य स्थितीला काँग्रेस सह भाजपाला डोकेदुखी बनली आहे.कॉंग्रेस की स्वाभिमानी या घोळात महाआघाडी अडकली आहे.तर भाजपातील गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी आणि अजित घोरपडे यांची निवडणुकीची तयारी,हे भाजपा समोर बंडखोरीचे मोठे आव्हान निर्माण झाल्याने भाजपा नेते नाराज नेत्यांची समजूत काढण्यात अडकली आहेत.Body:व्ही - सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २८ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.विद्यमान खासदार संजयकाका पाटील भाजपाकडून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.त्यांच्या विरोधात काँग्रेस की स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आद्यप स्पष्ट होऊ शकले नाही.त्यामुळे संजयकाका पाटील यांच्या तगड्या उमेदवारी विरोधात तगडा विरोधक कोण असणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसमधून विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवला .मात्र सांगलीची जागा नेमकी कोणाच्या वाटेला जाते यावर त्यांची भूमिका ठरेल,असं मानले जात आहे.

सांगलीच्या जागेचा तिढा आज सुटणार !

संध्याकाळ पर्यंत महाआघाडीतील सांगलीच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या ठिकाणी माघार घेत काँग्रेसला किंबहुना वसंतदादा घराण्याला ही जागा देण्याची भूमिका घेतली आहे.याबाबत प्रतीक पाटील यांनी विशाल पाटील यांची खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेऊन,आपण वसंतदादा घराण्याच्या विरोधात नसून सांगलीची जागा काँग्रेसला मिळेल आणि विशाल पाटील यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा असेल,असे स्पष्ट केले आहे.
यामुळे सांगलीची जागा काँग्रेसला आणि उमेदवारी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी दत्त शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपा समोर नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान..

भाजपा मधून नाराज व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे,संजयकाका पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून पडळकर यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे.संजय काकांना थेट आव्हान देत गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजपाचे नाराज नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.
येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांची बैठका घेऊन लोकसभेचा निर्णय जाहीर करणार आहेत.भाजपातील दोन्ही नेत्यांच्या
उमेदवारी निर्णयामुळे संजयकाका पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून गोपीचंद पडळकर यांचे बंडखोरी आणि अजितराव घोरपडे यांची निवडणुकीची तयारी थांबवणे,हे संजयकाका पाटील आणि भाजपसमोर आव्हान असणार आहे.
दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यां सोबत आज चर्चा होऊन,पडळकर यांची मुख्यमंत्री समजूत काढतील आणि पडळकर यांच्या उमेदवारीवर पडदा पडेल,अशी शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

वंचित बहुजन विकास आघाडी मैदानात..

तर सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन विकास आघाडी ही मैदानात उतरली आहे.या ठिकाणी कवठेमहांकाळ तालुक्याचे धनगर समाजच नेते जयसिंगतात्या शेंडगे हे निवडणूक लढवत आहेत.

या निवडणुकीत रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनाही मैदानात उतरली असून शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक माने निवडणूक लढवणार आहेत.

भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी प्रचाराची रणनीती सुरू केला,असून २८ मार्च रोजी संजयकाका पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत असलं तरी संजयकाका पाटील यांच्या समोर गोपीचंद पडळकर आणि अजितराव घोरपडे यांचे आव्हान सद्य स्थितीला असल्याने,या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात भाजप अडकली आहे.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस मधील परिस्थिती अलबेल आहे.जागा कॉंग्रेसला की स्वाभिमानीला आणि उमेदवार कोण या घोळात महाआघाडी अडकली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.