ETV Bharat / state

कहाणी जिद्दीचीः दुष्काळाच्या चक्रात अडकला पीक फेरा, तरीही 'किसन मानें'चा संघर्ष नाही झुकला...

गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या चक्रात पेरणीचा फेरा घेणाऱ्या सांगलीच्या धुळगाव येथील किसन माने यांची कहाणी...यंदाही माने यांनी मोठ्या अपेक्षाने पावसाच्या भरवशावर पेरणी केली आहे.

किसन मानें'चा संघर्ष नाही झुकला...
author img

By

Published : Jun 20, 2019, 7:00 AM IST

Updated : Jun 24, 2019, 7:47 PM IST

सांगली - 'आवंदा पाऊस पाणी होईल, चांगलं पीक येईल, हातात दोन पैक येतील, पण दुष्काळाचा फेरा काय संपत नाय, अन हाताला काय लागत नाय, पण करायचा काय म्हणून दरवेळी पीक पेरा घेतोय' ही व्यथा आहे, गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या चक्रात पेरणीचा फेरा घेणाऱ्या सांगलीच्या धुळगाव येथील किसन माने यांची. यंदाही माने यांनी मोठ्या अपेक्षाने पावसाच्या भरवशावर पेरणी केली आहे.

दुष्काळाच्या चक्रात अडकला पीक फेरा, तरीही 'किसन मानें'चा संघर्ष नाही झुकला...पहा स्पेशल रिपोर्ट....

सांगली जिल्ह्यातला पूर्व भाग तसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्‍यात दुष्काळ हा जणू पाचवीलाच पुजलेला आहे. काळानुसार वर्षानुवर्षे तालुक्यात दुष्काळाची छाया गडद होती गेली. दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी शासनाकडून वरदान ठरणाऱ्या टेंभू-ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजना राबवण्यात आल्या, मात्र अद्याप या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळ अजून हटू शकला नाही. परिणामी आजही पावसावरच जत, आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे आणि या दुष्काळाच्या दृष्टचक्रात आजही इथला शेतकरी अडकून पडलाय, अशाच एक शेतकऱ्यांपैकी कवठेमंकाळ तालुक्यातल्या अग्रणी धुळगाव येथील शेतकरी म्हणजे किसन माने..

फारसं शिक्षण नसणारे किसन माने यांची गावाबाहेरील वस्तीवर अर्धा एकर शेतजमीन आहे. दोन मुलं पत्नी आणि नातू असे सहा जणांचं कुटुंब. अनेक वर्षांपासून शेती करणाऱ्या मानेंची अवस्था त्यांच्या घराकडे एक नजर टाकली, तर क्षणात कळून येते, दोन छोट्या खोल्यांचे झोपडीचे खोपटे म्हणजे माने यांचे घर. आणि त्यांच्या या घराची अवस्था पाहून माने यांचे परिस्थिती काय आहे, हे सर्व काही आपसूक सांगून जाते.

पाण्याअभावी खरिपासह रब्बीही गेलं...
निसर्गावर अवलंबून असणारे माने कुटुंब आज खडतर प्रवासाची वाट तुडवत निघाले आहे. कारण वाट्याला अर्धा एकर शेत जमीन असूनही माने यांच्या हाताला काहीच लागत नाही. पण दुष्काळापुढे न झुकता माने यांनी दुष्काळाशी दोन हात करणे आजून सोडले नाही. माने आजही आपल्या शेतात काही तरी पिकेल या आशेने आणि करायचे काय या भावनेतून पेरणी करायचे थांबले नाहीत. गेल्यावर्षी माने यांनी खरिपात उडीद आणि बाजरीचे पीक घेतले होतं. काबाडकष्ट करत शेतीची मशागत करून पेरणी घेतली आणि पावसाच्या प्रतीक्षेत राहिले पण पुरेसा पाऊस झाला नाही. थोड्या प्रमाणात उडदाचे आणि बाजरीचे पीक आले पण निम्म्याहून अधिक पीक पाण्याअभावी करपून गेलं.
पण माने यांच्याकडे जिद्द अफाट पुन्हा रब्बी हंगामात मशागत, कुळवणी आणि पेरणी केली. मक्याची लागवड केली. पण तेही पाण्याअभावी नीट बहरू शकले नाही आणि व्हायचे तेच झालं. आर्धी-अधिक मक्याचे पीक पाण्याअभावी करपून गेले.

शासनाच्या पीक विम्यासाठी 'अनंत' अडचणी...
माने यांनी पीक विमाही भरला होता. पण शासनाच्या ब्रिटिशकालीन अटीमुळे माने यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. कारण माने यांच्या गावाची आणेवारी ही ५० पैशापेक्षा अधिक आहे. परिणामी नुकसान भरपाई मिळण्यास अडचण निर्माण होते. अशा त्यांनी एक-ना अनेक अडचणींचा सामना करत माने आपली शेती बहरेल या अपेक्षेने दुष्काळाशी लढत आहेत.

दुग्धव्यवसायातून कुटुंबाचा 'गाढा' सुरू -
संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रसंगी दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो, तर संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी माने यांच्या पत्नी मंगल ही हातभार लावतात. घरी शेळी, गाय यांच्या पालन करत दूध विक्रीतून घर चालवण्यासाठी मदत करतात. पण, अशात ही त्यांना नातवाच्या आजारपणाचा नवा प्रश्न अधून-मधून निर्माण होत असतो. त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवायचा या चिंतेत माने कुटुंब आहे.

निसर्गाच्या अवकृपेने मुलांच्या शिक्षणाची वाताहात -
निसर्गाच्या अवकृपेमुळे माने यांच्या मुलांच्या शिक्षणावर ही विपरीत परिणाम झाला आहे. शेतीत फारसा उत्पन्न मिळत नसल्याने मुलांचे उच्च शिक्षण ते पूर्ण करू शकले नाही. दोन्ही मुलांना कशे-बशे दहावीपर्यंत शिक्षण देऊ शकले, पुढच्या शिक्षणासाठी येणारी खर्च वडिलांना पेलणार नसल्याने दहावीनंतर दोन्ही मुलांनी कामधंद्या करणे पसंत करत मिळेल ते काम करत आहेत.

तंत्रज्ञानात वाढ झाली मारक -
मोठा मुलगा अनिल त्याला एक पत्नी मुलगा असा परिवार आहे. आई वडिलांच्या सोबतच छपराच्या घरात राहतो. घरची शेती असूनही पिकत नसल्याने दुसऱ्यांची शेती पिकवण्यासाठी बैलांच्यासह रोजंदारीवर जावं लागतं. आपल्या शेतात पावसाअभावी काहीच पिकत नाही. त्यामुळे करायचे काय हा प्रश्न असतो आणि घरची बैलं आहेत, त्यांना घेऊन दुसऱ्यांच्या शेतात जाऊन नांगरणी, पेरणी करून पैसे मिळतात. पण त्याचे प्रमाण आता फार कमी होत चालल आहे. कारण ट्रॅक्टरने शेतीची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे बैलांच्या कडून नांगरणी मागणी कमी झाली असल्याचे अनिल सांगतात. तर माने यांनी यंदा चार एकर जमिन कसण्यासाठी घेऊन आपले नशीब आजमावून बघत आहेत.

धाकटा मुलगा नागेशने दहावी नंतर आयटीआयमधून इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून वायरिंगचे काम शिकून घेतले आहे. त्यामुळे गावात छोट्या-मोठ्या वायरिंगच्या कामाबरोबर घरची व शेतीची कामे करून वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण शेती नीट पिकली नाही, यामुळे दोघा भावांचे उच्च शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत नागेश व्यक्त करत आहे.

पाईपलाईनसाठी पैशांची अडचण -
विशेष म्हणजे माने यांच्या शेतापासून काहीच अंतरावर अग्रणी नदी गेली आहे, पण नदी तर काय करणार कारण निसर्गाची अवकृपा कायम आहे. त्यामुळे पाऊस पडत नसल्याने नदी जशी कोरडी राहते तशी माने यांची शेतीही कोरडी बनत आहे. तर कधी-नव्हे ते यंदाच्या वर्षी अग्रणी नदीत म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी दाखल झालं आहे. पण पाणी शेतात आणण्यासाठी त्यांच्या कडे पाईपलाईनची व्यवस्था नाही. आणि ती व्यवस्था करण्यासाठी माने यांच्याकडे पैसेही नाहीत. त्यामुळे पाणी तोंडाशी येऊनही ते घशात उतरु शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

दीड लाखाचा कर्जांचा डोंगर माने कुटुंबीयाच्या डोक्यावर -
कुटुंबाचा चरितार्थ चालवणं माने यांच्या समोर दररोज आव्हान बनले आहे. या सर्वाला तोंड देताना त्यांच्यावर कर्जाचा डोंगरसुद्धा झाला आहे. बँकेचे १ लाख आणि सोसायटी व हात उसने घेतलेले असे जवळपास दीड लाखांचे कर्ज माने यांच्यावर आहे.

अशा अनंत अडचणींना तोंड देत दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या माने यांनी, आपल्या शेतात पेरणीच्या फेऱ्याला मात्र कधी थांबू दिले नाही. आता मृगाचा पेरा सुरू आहे. माने यांनी आपली जमीनीची पूर्ण मशागत करत यंदा मिरगाचा मक्का घेतला आहे. दररोज आपली शेतात जाऊन ढगांच्याकडे नजर टाकत चातकाप्रमाणे पाऊसाची वाट पाहत, आवंदा पाऊस पाणी होईल, चांगलं पीक येईल, आणि हातात दोन पैक येईल, अशी अपेक्षा बाळगत आहेत.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

PKG -

FEED SEND, FILE NAME - MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_EDITING_7203751

MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_VIS_4_7203751

MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_BYT_1_KISAN_MANE_7203751

MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_BYT_2_ANIL_MANE_7203751

MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_BYT_3_NAGESH_MANE_7203751

MH_SNG_EK_DIVAS_BALIRAJ_SOBAT_18_JUNE_2019_BYT_4_MANGAL_MANE_7203751

स्लग - दुष्काळाच्या चक्रात,अडकला पिक फेरा..तरीही संघर्ष नाही झुकला..किसन मानेंच्या जिद्दीची कहाणी...

अँकर - आवंदा पाऊस पाणी होईल,चांगलं पीक येईल,हातात दोन पैक येईल,पण दुष्काळाचा फेरा काय संपत नाय,अन हाताला काय लागत नाय,पण करायचा काय म्हणून दरवेळी पीक पेरा घेतोय..
ही व्यथा आहे,गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या चक्रात पेरणीचा फेरा घेणाऱ्या सांगलीच्या धुळगाव येथील किसन माने यांची..यंदाही माने यांनी मोठया अपेक्षाने पाऊसाच्या भरवश्यावर पेरणी केली आहे.

Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यातला पूर्व भाग तसा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो त आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्‍यात दहा दुष्काळ जणू पाचवीलाच पुजलेला आहे. वर्षानुवर्ष तालुक्यात दुष्काळाची छाया गडद होती गेली.दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी शासनाकडून वरदान ठरणाऱ्या टेंभू -ताकारी आणि म्हैसाळ सिंचन योजना राबवण्यात आल्या,मात्र अद्याप या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे दुष्काळ अजून हटू शकला नाही,परिणामी आजही पावसावरच जत,आटपाडी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागतं आहे.आणि या दुष्काळाच्या दृष्टचक्रात आजही इथला शेतकरी अडकून पडलाय,अशाच एक शेतकऱ्यांपैकी कवठेमंकाळ तालुक्यातल्या अग्रणी धुळगाव येथील शेतकरी म्हणजे किसन माने ..

फारसं शिक्षण नसणारे किसन माने यांची गावाबाहेरील वस्तीवर अर्धा एकर शेतजमीन आहे.दोन मुलं पत्नी आणि नातू असे सहा जणांचं कुटुंब.अनेक वर्षापासून शेती करणाऱ्या मानेंचे अवस्था त्यांच्या घराकडे एक नजर टाकली,तर क्षणात कळून येते,दोन छोट्या खोल्यांचे झोपडीचे खोपटे म्हणजे माने यांचे घर.आणि त्यांच्या या घराची अवस्था पाहून माने यांचे परिस्थिती काय आहे,हे सर्व काही आपसूक सांगून जाते..

निसर्गावर अवलंबून असणारे माने कुटुंब आज खडतर प्रवासाची वाट तुडवत निघाले आहे.कारण वाट्याला अर्धा एकर शेत जमीन असूनही माने यांच्या हाताला काहीच लागत नाही.पण दुष्काळापुढे न झुकता माने,यांनी दुष्काळाशी दोन हात करणे आजून सोडले नाही,माने आजही आपल्या शेतात काहीतरी पिकल या आशेने आणि करायचे काय या भावनेतून पेरणी करायचे थांबले नाहीत.गेल्यावर्षी माने यांनी खरिपात उडीद आणि बाजरीचे पीक घेतलं होतं.काबाडकष्ट करत शेतीची मशागत करून पेरणी घेतली आणि पावसाच्या प्रतीक्षेत राहिले पण पुरेसा पाऊस झालं नाही.थोड्या प्रमाणात उडदाचे आणि बाजरीचे पीक आलं,पण निम्म्याहून अधिक पीक पाण्या अभावी करपून गेलं..पण माने यांच्याकडे जिद्द अफाट पुन्हा रब्बी हंगामात मशागत, कुळवणी आणि पेरणी केली.आणि मक्याची लागवड केली.पण तेही पाण्याअभावी नीट बहरू शकले नाही. आणि व्हायचे तेच झालं.आर्धी-अधिक मक्याचे पीक पाण्याअभावी करपून गेलं. माने यांनी पीक विमाही भरला होता,पण शासनाच्या ब्रिटिश कालीन अटीमूळे माने यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही.कारण माने यांच्या गावाची आणेवारी ही ५० पैश्यापेक्षा अधिक आहे.परिणामी नुकसान भरपाई मिळण्यास अडचण निर्माण होते. अशा त्यांनी एक ना अनेक अडचणींचा सामना करत माने आपली शेती बहरले अपेक्षेने दुष्काळाशी लढत आहेत.

संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रसंगी दुसऱ्यांच्या शेतात रोजंदारीवर जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो, तर संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी माने यांच्या पत्नी मंगल ही हातभार लावतात. घरी शेळी,गाय यांच्या पालन करत दुधा विक्रीतुन घर चालवण्यासाठी मदत करतात.पण अश्यात ही त्यांना नातवाच्या आजार पणाचा नवा प्रश्न अधून-मधून निर्माण होत असतो,त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवयाचा या चिंतेत माने कुटुंब असतं .

निसर्गाच्या अवकृपेमुळे माने यांच्या मुलांच्या शिक्षणावर ही विपरीत परिणाम झाला आहे.शेतीत फारसा उत्पन्न मिळत नसल्याने मुलांचे उच्च शिक्षण ते पूर्ण करू शकले नाही.दोन्ही मुलांना कशे-बशे दहावीपर्यंत शिक्षण देऊ शकले,पुढच्या शिक्षणासाठी येणारी खर्च वडिलांना पेलणार नसल्याने दहावीनंतर दोन्ही मुलांनी काम धंद्या करणे पसंत करत मिळेल ते काम करत आहेत.

मोठा मुलगा अनिल त्याला एक पत्नी मुलगा असा परिवार आहे.आई वडिलांच्या सोबतच छपराच्या घरात राहतो.घरची शेती असूनही पिकत नसल्याने दुसरयांची शेती पिकवन्यासाठी बैलांच्यासह रोजंदारीवर जावं लागतं.आपल्या शेतात पावसाअभावी काहीच पिकत नाही,त्यामुळे करायचे काय हा प्रश्न असतो आणि घरची बैलं आहेत, त्यांना घेऊन दुसऱ्यांच्या शेतात जाऊन नांगरणी,पेरणी करून पैसे मिळतात,पण तेचे प्रमाण आता फार कमी होत चालल आहे.कारण ट्रॅक्टरने शेतीची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत.त्यामुळे बैलांच्या कडून नांगरणी मागणी कमी झाली असल्याचे अनिल सांगतात. तर माने यांनी यंदा चार एकर जमिन कसण्यासाठी घेऊन आपले नशीब आजमावून बघत आहेत.

धाकटा मुलगा नागेश यांनी दहावी नंतर आयटीआय मधून इलेक्ट्रॉनिकचा कोर्स करून वायरिंगचे काम शिकून घेतले आहे. त्यामुळे गावात छोटी-मोठी वायरिंगच्या कामा बरोबर घरची व शेतीची कामं करून वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो,पण शेती नीट पिकली नाही,यामुळे दोघा भावांचे उच्च शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही,ही खंत नागेश व्यक्त करतोय.

विशेष म्हणजे माने यांच्या शेतापासून काहीच अंतरावर अग्रणी नदी गेली आहे ,पण नदी तर काय करणार कारण निसर्गाची अवकृपा कायम आहे.
त्यामुळे पाऊस पडत नसल्याने नदी जशी कोरडी राहते तशी माने यांची शेतीही कोरडी बनत आहे.तर कधी - नव्हे ते यंदाच्या वर्षी अग्रणी नदीत म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी दाखल झालं आहे.पण पाणी शेतात आणण्यासाठी त्यांच्या कडे पाईपलाईनची व्यवस्था नाही.आणि ती व्यवस्था करण्यासाठी माने यांच्याकडे पैसेही नाहीत..त्यामुळे पाणी तोंडाशी येऊनही ते घशात उतरु शकत नाही,अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Conclusion:कुटुंबाचा चरितार्थ चालवणं माने यांच्या समोर दररोज आव्हान असतं,आणि या सर्वाला तोंड देताना त्यांच्यावर कर्जाचा डोंगरसुद्धा झाला आहे.बँकेचे एक लाख आणि सोसायटी व हात उसने घेतलेलं असे जवळपास दीड लाखांचे कर्ज माने यांच्यावर आहे.अश्या सर्व परिस्थिती दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या माने यांनी,आपल्या शेतात पेरणीच्या फेऱ्याला मात्र कधी थांबू दिले नाही.आता मृगाचा पेरा सुरू आहे.आणि माने यांनी आपली जमीनीची पूर्ण मशागत करत यंदा मिरगाचा मक्का घेतला आहे.दररोज आपली शेतात जाऊन ढगांच्याकडे नजर टाकत चातका प्रमाणे पाऊसाची वाट पाहत,आवंदा पाऊस पाणी होईल,चांगलं पीक येईल, आणि हातात दोन पैक येईल,अशी अपेक्षा बाळगतात...

Last Updated : Jun 24, 2019, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.