ETV Bharat / state

शेतकऱ्यांनो आता कमी खर्चात घ्या भरघोस उत्पादन! सांगलीच्या संशोधकाचा दावा - agriculture

शेतीसाठी लागणाऱ्या संसाधनांची बचत करण्यास मदत करणारे फोलडॅक नावाचे संगणकीय स्वयंचलित यंत्राची पाटील यांनी निर्मिती केली आहे.

कॉम्पुटराईज्ड स्वयंचलित यंत्र
author img

By

Published : Jun 8, 2019, 9:42 PM IST

सांगली - राज्यामध्ये बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. त्यामुळे पाणी, खतांचा अवास्तव वापर होऊन जमीन नापीक होण्याचा धोका संभवतो. पंरतु, यावर सांगलीच्या शरद पाटील या संशोधकाने अफलातून उपाय शोधला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या संसाधनांची बचत करण्यास मदत करणारे फोलडॅक नावाचे संगणकीय स्वयंचलित यंत्राची पाटील यांनी निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे योग्य प्रमाणात पाणी सोडून ६० टक्के पाण्याची बचतही होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अत्याधुनिक फोलडॅक यंत्रणेचे फायदे

इस्राईल टेक्नॉलॉजीच्या पुढील टेक्नॉलॉजी या यंत्रामध्ये असल्याचा दावा शरद पाटील यांनी केला आहे. शरद पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी एम. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांचा शेती करताना होणाऱ्या भरमसाठ खर्चावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना बरोबर घेऊन संशोधन सुरू केले होते. गेल्या ३ वर्षांपासून ते यावर काम करत होते. अखेर त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले आहे.

फोलडॅक नावाची स्वयंचलित मशीन पाटील यांनी तयार केली आहे. जमिनीची क्षारता (ईसी) आणि सामू (पीएच) याचा आधार घेत हे यंत्र काम करते. शेती करताना नुसते खते पाणी नाही तर, अनेक घटक उत्पादनावर परिणाम करत असतात. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे या यंत्राद्वारे शक्य होत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूरच्या पट्टणकोडोली येथील गौरव मगदूम हे यंदा आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी आपल्या १२ एकर ऊस शेतीचे नियोजन करण्यासाठी शरद पाटील यांनी बनवलेली फोलडॅक यंत्रणा बसवली आहे. कमी जागेत शेताच्या एका खोलीत मगदूम यांनी ही स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे. यामुळे मगदूम यांचे पाणी, मजूर, खत यांची बचत झाली आहे. शिवाय मगदूम यांचा खोडवा ऊस पाणी आणि खतांचा योग्य मात्रा मिळाल्याने चांगला वाढला आहे. दरवर्षी ४० ते ५० टन एकरी उत्पादन होते, मात्र यंदा ऊसाची वाढ पाहता ७० ते ८० टन उत्पादन होईल असा विश्वास मगदूम यांनी व्यक्त केला आहे.

काय करते मशीन.....

  • मशिन पिकाला नेमके किती पाणी आणि खत पाहिजे हे सांगते. त्यानुसार पिकाला पाणी दिले जाते.
  • योग्य मात्रा सांगुन खते आणि पाण्याची बचत करण्यास मदत.
  • हवामानाचा अंदाज.
  • ड्रोन मॅपिंग सुविधेद्वारे गरज असेल तेथे फवारणी करता येते.
  • पिकांवरील रोग निदान करता येते.
  • जमिनीची आद्रता.
  • पिकाच्या पानांचे बाष्पीभवन

Intro:सरफराज सनदी - सांगली .

PKG - Special

feed send file name - MH_SNG_AGRO_INOVETION_09_JUNE_2019_VIS_1_7203751 - TO - MH_SNG_AGRO_INOVETION_09_JUNE_2019_VIS_1_7203751 - to - MH_SNG_AGRO_INOVETION_09_JUNE_2019_VIS_5_7203751

स्लग - शेती करताय,मग पाणी,खतांच्या नियोजनाचे आता टेंशन विसरा..कारण शेतकऱ्यांचा मदतीला आता आले आहे हे यंत्र...

अँकर - पाणी ,वीज ,मजूर आणि महागडी खतं यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे आधुनिक यंत्र सांगलीच्या अवलिया संशोधकाने विकसित केले आहे.कॉम्पुटराईज्ड स्वयंचलित यंत्र शरद पाटील यांनी बनवले असून भारतातील एकमेव उत्पादन असल्याचा दावा करत ६० टक्के पाणी,खत बचत होऊन भरघोस उत्पन्न शेतकरयांना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे..पाहूया ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट..

Body:व्ही वो - भारत हा कृषी प्रधान देश मानला जातो,आजही पारंपारिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.मात्र सध्या पाण्याची,विजेची आणि मजुरांची टंचाई, शिवाय महागडी खते,यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे आता भारतीय शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहे..इस्राईल सारख्या देशाने जागतिक शेती क्षेत्रात आधुनिक शेतीची वाट दाखवून दिली आहे.अत्यंत कमी पाणी ,खत ,मजुर या गोष्टींवर माता कमी श्रम आणि पैश्याची बचत व उत्पादनात भरघोस वाढ देणारी यंत्रे विकसित केली आहेत.सध्या भारतात शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी करण्याकडे आपला कल वाढला आहे.मात्र भरमसाठ किंमत असल्यामुळे ती सर्वच शेतकऱ्यांना परवडणारी नाही,पण आता याची चिंता करण्याची भारतीय शेतकऱ्यांना काळजी नाही,कारण सांगलीतल्या शेतकरी कुटुंबातील एका अवलिया संशोधकाने भारतीय बनावटीचं भारतातलं पहिलं कॉम्प्युटराईज्ड स्वयंचलित पाणी,खत नियंत्रण यंत्र विकसित केला आहे.मूळचे सांगलीचे असणारे शरद पाटील यांनी हे अद्यावत असं भारतीय कृषी क्षेत्राला एक नवी संजीवनी देणारे,ऑटोमायझेशन मशीन बनवले आहे.यातली वैशिष्ट्य म्हणजे इस्राईल टेक्नॉलॉजीच्या पुढील टेक्नॉलॉजी त्यांच्या मशीन मध्ये असल्याचा दावा शरद पाटील यांनी केला आहे.
शरद पाटील हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी एम फार्मसी हे पदवी शिक्षण घेतले आहे.यानंतर त्यांच्या पुढे प्रश्न होता,तो आजच्या शेतकरयांसमोर असणाऱ्य महत्वाच्या पाणी,वीज,मजूर आणि खत यांच्यावर होणार भरमसाट खर्च व शेतकरयांचा वाया जाणार वेळ यावर मार्ग काढण्याचा,आणि यातून पाटील यांनी आपल्या काही इंजिनियर मित्रांसोबत याबाबत गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू केले होते.आणि अखेर त्यांना यामध्ये यश प्राप्त झाले आहे.आणि फोलडॅक नावाची स्वयंचलित मशीन पाटील आणि त्यांच्या मित्रांनी निमार्ण केली आहे.वास्तवीक जमिनीची शारत (ईसी) व सामू (पीएच) यांचा मेळ घालणे कठीण काम आहे,पण पाटील यांनी ही किमया आपल्या मशीन मध्ये साध्य करून दाखवली आहे.

काय करते मशीन ..

खरंतर कोणत्याही पिकाला कमी किंवा अतिरिक्त पाणी व खत दिल्यास त्याचे पिकाच्या उत्पादना मोठे परिणाम होतात.

मात्र,पाटील यांच्या मशीन द्वारे पिकाला नेमके किती पाणी आणि खत पाहिजे आहे,हे सांगण्यात येते.

आणि शेतकऱ्यांने फक्त या मशीन द्वारे कमांड द्याची,आणि ही मशीन पिकांना गरजे नुसार अचूक पाणी व खत पोहचवते.
यासाठी ठिबक प्रणाली ही अत्यावश्यक आहे.

या यंत्राने द्वारे पाण्याची ६० टक्के बचत आणि खतांचा कमी वापर होतो..

हवामान अंदाजाची सुविधा ..

इतर कोणत्याही टेक्नॉलॉजीमध्ये हवामान अंदाजाची सुविधा नाही,मात्र पाटील यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये अद्यावत हवामानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे पडणाऱ्या पावसाच्या अंदाजावर ही मशीन पिकांना पाणी देण्याचे अचूक निर्देश शेतकऱ्याला देते.

ड्रोन मॅपिंग आणि रोग निदान सुविधा..

शरद पाटील यांच्या या मशीन मध्ये ड्रोन मॅपिंग सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.ज्यामुळे पिकाचे अचूक मॅपिंग करून रोग निदान शोधून त्यावर कोणते खत फवारणी करायचे आहे.हे सूचित करून ते ड्रोनद्वारे अचूक ठिकाणी फवारणी करता येते.

बाईट - शरद पाटील - स्वयंचलित यंत्र,संशोधक,सांगली.

व्ही वो - शेतकऱ्यांना पाणी,विज,मजुर आणि खतांचा सांगड घालणे आज जिकरीचे बनले आहे.शिवाय उत्पादन कमी यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती करणारी कोल्हापूरच्या पट्टणकोडोली येथील गौरव मगदूम हे यंदा आधुनिक शेतीकडे वळले आहेत.त्यांनी आपल्या १२ एकर ऊस शेतीचे नियोजन करण्यासाठी शरद पाटील यांचे फोलडॅक यंत्रणा बसवली आहे.कमी जागेत शेताच्या एका खोलीत मगदूम यांनी ही स्वयंचलित यंत्रणा बसवली आहे.यामुळे मगदूम यांचे पाणी,मजूर ,खत यांची बचत झाली आहे. शिवाय मगदूम यांचा खोडवा ऊस पाणी आणि खतांचा योग्य मात्रा मिळाल्याने चांगला वाढला आहे,दरवर्षी ४० ते ५० टन एकरी उत्पादन होते,मात्र यंदा ऊसाची वाढ पाहता ७० ते ८० टन उत्पादन होईल असा विश्वास मगदूम यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - गौरव मगदूम - शेतकरी , पट्टणकडोली ,कोल्हापूर.

Conclusion:व्ही वो - शेती बाबत शेतकऱ्यांची असणार पाणी,खत,मजूर,उत्पादन याची ओरड, शरद पाटील यांनी विकसित केलेल्या स्वयंचलित यंत्रामुळे थांबू शकणार आहे, शिवाय भारतातील बदलत्या कृषी क्षेत्राला एक नवी दिशा देणारा असल्याचा दावा करण्यात आला आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.