सांगली - जिल्ह्यात एकाच दिवसात पाच नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुजरातमधून कडेगावच्या भिकवडी येथे आलेल्या ८ वर्षाच्या मुलासह ४ तर कुपवाड मधील एकाला असे ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जिल्ह्यातील ३ जण हे कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या ही १७ झाली आहे. कोरोना नोडल अधिकारी डॉ.संजय साळुंखे यांनी ही माहिती दिली आहे.
सांगली जिल्ह्याची चिंता वाढवण्याबरोबर दिलासा देणारा शनिवारचा दिवस ठरला आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथून आलेल्या ४ जणांना तर अन्य एकाला असे ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील साळशिंग येथील ८ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. हा मुलगा गुजरातच्या अहमदाबादवरून सळशिंगमध्ये आलेल्या कोरोनाबाधित महिलेचा पुतण्या आहे आणि तो सुद्धा अहमदाबादवरून एकाच गाडीतून गावी पोहचला होता. त्यामुळे त्याची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर गुजरातवरून कडेगावच्या भिकवडीमध्ये आलेल्या त्या गाडीतील व्यक्तींना कडेगावमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ३ जणांनी कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले आहेत. हे ३ जण भिकवडी मधील आहेत.
तसेच सांगलीच्या वसंतदादा पाटील साखर कारखान्या नजीक असणाऱ्या लक्ष्मीनगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री अद्याप स्पष्ट झाली नाही. तर या व्यक्तीला कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर एकाच दिवसात ५ कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.
तर दुसऱ्या बाजूला दिलासा देणारी बातमी आहे.जिल्ह्यातील ३ कोरोना बाधित रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईहून आलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावीतील आणि त्याच्याशी संबंधित घोरपडी आणि कुपवाड मधील हे ३ कोरोना बाधित होते. त्यांच्यावर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा उपचार कार्यकाल पूर्ण झाल्याने कोरोना टेस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींना मिरज रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन १४ दिवसांसाठी इन्स्टिट्यूट क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यात ३ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर ५ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा १७ वर पोहचला आहे.
चिंता आणि दिलासा... एकाच दिवसात ५ नवे कोरोना रुग्ण; तर ३ जण कोरोनामुक्त, जिल्ह्याचा आकडा १७ वर - सांगली कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
सांगली जिल्ह्याची चिंता वाढवण्याबरोबर दिलासा देणारा शनिवारचा दिवस ठरला आहे. जिल्ह्यात ३ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, तर ५ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा १७ वर पोहोचला आहे.