सांगली - घोडेबाजार करून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेची सत्ता मिळवली आहे. असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. महापौर निवडीत भाजप पक्षासोबत घोकाबाजी करणाऱ्या त्या 7 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करणार असल्याचा इशारा, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे - म्हैसाळकर यांनी दिला आहे.
त्या नगरसेवकांवर होणार कारवाई..!
सांगली महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना भाजप व सहयोगी सदस्यांनी महापौर व उपमहापौर निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादीला केलेल्या उघड मतदानामुळे भाजपाला सांगली महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे.या निवडणुकीत भाजपाकडून व्हीप काढणात आलेले असताना भाजपाच्या 4 आणि 1 सहयोगी सदस्यांने महापौर-उपमहापौर निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले आहे. 2 सदस्य हे गैर हजर राहिले, अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर या निवडणुकीमध्ये भाजपाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आहे. स्पष्ट बहुमताच्या जोरावर महापालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपाला महापौर-उपमहापौर निवडीच्या निमित्ताने पराभावाला सामोरे जावे लागले आहे. विरोधी मतदान करणाऱ्या सदस्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्या 7 नगरसेवकांच्यावर व्हीप डावलून पक्षा विरोधी भूमिका घेतल्याने त्यांचावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार, असल्याचा दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी स्पष्ट केला आहे.
राष्ट्रवादी आघाडीकडून घोडेबाजर -
तसेच जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन महापालिकेची सत्ता दिलेली असताना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या निवडणुकीमध्ये घोडेबाजार बाजार ककेला आहे. भाजपच्या अनेक सदस्यांनी पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते,असा आरोप शिंदे म्हैसाळकर यांनी केला आहे.