सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. 18 जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये काट्याची लढत होत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 18 जागांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदानाला सुरुवात, मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदमांनी बजावला हक्क - डीसीसी बँक सांगली
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. 18 जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये काट्याची लढत होत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 18 जागांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
DCC Bank sangli
सांगली - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. 18 जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये काट्याची लढत होत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 18 जागांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
12 केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून 2 हजार 576 मतदार आहेत. त्यापैकी 2 हजार 219 संस्था सभासद असून 354 हे वैयक्तिक मतदार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रक्रिया गटातून इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर येथे मतदान केले आहे. तर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगलीमध्ये मतदानाचा हक्क बाजवला आहे.
महाआघाडीचा विजय होईल - कदम
यावेळी मंत्री विश्वजित कदम म्हणाले, महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनेलचे तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पॅनलला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सर्व 18 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला आहे.
23 रोजी मतमोजणी -
18 जागांसाठी निवडणूक होत असलेल्या या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनेलचे 16 उमेदवार उभे आहेत, तर दोन जागांवर अपक्ष मैदानात उतरले आहेत. अत्यंत चुरशीने या निवडणुकीचा प्रचार झाला असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हा बँकेत कोणाचे वर्चस्व असणार हे स्पष्ट होणार असून जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Last Updated : Nov 21, 2021, 3:14 PM IST